घरताज्या घडामोडीग्रुप चॅट वर गँगरेपची चर्चा; चॅट व्हायरल झाले आणि...

ग्रुप चॅट वर गँगरेपची चर्चा; चॅट व्हायरल झाले आणि…

Subscribe

सोमवारी सकाळी #Boyslockroom हा हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेण्ड होत होता.  हे इन्स्टाग्रामवर तयार करण्यात आलेल्या ग्रपुच नाव आहे. ज्यावर शाळेतील काही मुलं अश्लील चॅट करत होते. या ग्रुपवर मुलींचे फोटो टाकून गँगरेप करण्यावर चर्चा केली जात होती. एका ट्वीटर यूजरने हा ग्रुपचा स्क्रीन शॉट ट्वीटरवर टाकला होता. इंस्टाग्रामवरील बॉईज लॉकर रूममध्ये केलं गेलेलं अश्लील चॅट बघून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

ट्वीटरवर #boyslockerroom ट्रेण्डींगमध्ये होतं. या ग्रुपवर केले गेलेल्या चॅटवरून लोकांनी कारवाईची मागमी केली होती. या ग्रुपमधील जास्तीत जास्त मुलं ही साऊथ दिल्लीची आहेत. दिल्ली पोलिस सायबर सेल द्वारा या घटनेची चौकशी करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने अज्ञांतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम ६६ आणि ६७ अ द्वारे गुन्हा दाकल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. पोलिसांनी इंन्स्टाग्रामला पत्र लिहून त्याचे डिटेल्स मागितले आहेत.

- Advertisement -

दिल्ली महिला आयोगाने दिल्ली पोलिस आणि इंस्टाग्रामला नोटिस पाठवली आहे. हा ग्रुप इन्स्टाग्रामवर आता डिएक्टीव्ह झाला आहे.

स्वाति मालीवालने ट्वीट करत म्हटले आहे की, इंन्स्टाग्राम वर बॉईज लॉकर रूम हा ग्रुप तयार करण्यात आला. अशाप्रकराची घटना अपराधी आणि बलात्कारी मानसिकता दाखवते. या ग्रुपमधील सगळ्या मुलांना अटक करण्यात यावी. त्यामुळे इतर लोकांना यातून शिकवण मिळेल.


हे ही वाचा – ‘जग कोरोनाशी लढतय पण काही जण दहशतवाद पसरवत आहे’, मोदींचा ‘पाक’वर निशाणा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -