घरCORONA UPDATE'जग कोरोनाशी लढतय पण काही जण दहशतवाद पसरवत आहे', मोदींचा 'पाक'वर निशाणा!

‘जग कोरोनाशी लढतय पण काही जण दहशतवाद पसरवत आहे’, मोदींचा ‘पाक’वर निशाणा!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज NAM Summit मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला होता. त्यामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी  आज सगळेच देश झटत आहेत. १२३ देश कोरोना रूग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याकडे लक्ष देत आहेत मात्र काहीजण दहशतवाद, बनावट व्हिडीओ, खोट्या बातम्या यांचा व्हायरस पसरवत आहेत असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज NAM Summit मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला होता. त्यामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -

“सगळं जग करोनाचा सामना करतं आहे. मात्र त्याचवेळी फेक न्यूज, डॉक्टरेड व्हिडीओज आणि दहशतवादाचा भयानक व्हायरस पसरवत आहेत. संकटाच्या या क्षणी आपल्याला लोकांच्या कल्याणावर, आर्थिक वृध्दीवर लक्ष देणं गरजेचं आहे.

आज भारताला आरोग्यविषय वस्तूंची गरज आहे. असे असतानाही भारताने १२३ देशांना मदतीचा हात पुढे केला आहे. ५९ देश हे Non Aligned Movementमधील देश आहेत. या संम्मलेनात देशा देशातील सहयोग वाढण्यावर आणि कोरोनाच्या इलाजावर चर्चा करण्यात आली.

- Advertisement -

कोरोना विरोधातली लढाई ही सामान्य माणसाची चळवळ झाली आहे. आमच्या देशातील नागरिकांची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहेच. त्याशिवाय इतर देशातल्या लोकांनाही आम्ही मदत करत आहोत असंही मोदींनी या चर्चेदरम्यान म्हटलं आहे.


हे ही वाचा – धारावीत दिवसभरात ४२ नवे रूग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या ६३२वर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -