घरताज्या घडामोडीनाशिक जिल्हा ६०० पार; मालेगाव पाचशेच्या उंबरठ्यावर

नाशिक जिल्हा ६०० पार; मालेगाव पाचशेच्या उंबरठ्यावर

Subscribe
मालेगावात करोनाचे थैमान सुरु असून, शनिवारी (९) सकाळी प्रलंबित ५६६ नमुन्यांपैकी २५५ रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये २०५ निगेटिव्ह व ५० पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळून आले. यामध्ये नाशिक शहरात एक व मालेगावातील ४९ रुग्ण करोनाबाधित आहेत. मालेगावात ४९७ रुग्ण करोनाबाधित असल्याने मालेगाव पाचशेच्या उंबरठ्यावर आहे. आता नाशिक जिल्ह्यात एकूण ६२२ रुग्ण करोनाबाधित आहेत.

      नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी  प्रशासनास २५५ रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामधील ४९ रिपोर्ट मालेगावातील पॉझिटिव्ह रुग्णांचे आहेत. मालेगावात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही, मालेगावसह जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवावा, मास्कचा वापर करणे गरजेचे झाले आहे.

कोणार्कनगरमधील दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह
आडगावजवळील कोणार्कनगर शुक्रवारी डॉक्टरला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असताना शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये कोणार्कनगरमध्ये पुन्हा एक रुग्ण करोनाबाधित आढळून आला आहे.

नशिक करोना अपडेट
पॉझिटिव्ह रुग्ण ६२२
नशिक ४५
मालेगाव ४९७

नाशिक ग्रामीण ६१
जिल्ह्याबाहेरील १९
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -