घरदेश-विदेशजम्मू काश्मीरच्या चकमकीत हिज्बुलचे दोन दहशतवादी ठार; एक जवान शहीद

जम्मू काश्मीरच्या चकमकीत हिज्बुलचे दोन दहशतवादी ठार; एक जवान शहीद

Subscribe

जम्मू काश्मीरमधील डोडा येथे भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास जवानांना यश आले आहे. या चकमकीत एका जवानाला वीरमरण आले आहे. घटनास्थळी हिज्बुलचे दोन दहशतवादी लपले होते. यातील एक दहशतवादी हा काश्मीरचा असल्याचे सांगितले जाते. ही चमकम डोडातील गुडुना परिसरात झाल्याचे समजते. जवानांनी या संपूर्ण परिसराला विळखा घातला आहे. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू असून दहशतवादी तेथील घरांमध्ये लपून बसल्याचे सांगितले जात आहे.

सविस्तर माहिती लवकरच…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -