घरदेश-विदेशअम्फान वादळाचा रेल्वेलाही धोका! लोखंडी साखळीने बांधले रेल्वेचे डब्बे!

अम्फान वादळाचा रेल्वेलाही धोका! लोखंडी साखळीने बांधले रेल्वेचे डब्बे!

Subscribe

'अम्फान' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हावरा येथील शालिमार साइडिंगमध्ये उभ्या असलेल्या काही रेल्वेच्या डब्यांना लोखंडी साखळ्यांसह कुलूप लावून बांधून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आज पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ‘अम्फान’ हे सुपर चक्रीवादळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. १८५ ते १५५ किलोमीटर प्रति तास असा या वादळचा वेग असल्याने या तुफान वेगाचा रेल्वे सेवेला मोठा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. हा धोका रोखण्यासाठी हावरामध्ये काही रेल्वे गाड्यांच्या डब्ब्यांना लोखंडी साखळीने बांधण्यात आले आहे. जेणेकरून या वादळी वाऱ्यामुळे रेल्वेच्या डब्यांना होणारे नुकसान टाळता येईल.

- Advertisement -

‘अम्फान’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हावरा येथील शालिमार साइडिंगमध्ये उभ्या असलेल्या काही रेल्वेच्या डब्यांना लोखंडी साखळ्यांसह कुलूप लावून बांधून ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण देशात कोरोना संकटामुळे रेल्वे सेवा ठप्प असली तरी लॉकडाऊनदरम्यान श्रमिक स्पेशल गाड्या चालवल्या जात आहे, त्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने दक्षिण पूर्व रेल्वेने ही खबरदारी घेतल्याचे सांगितले जात आहे.


Cyclone Amphan: अम्फान चक्रिवादळाने पकडला वेग; बंगाल-ओडिशामध्ये पाऊस

दरम्यान, रेल्वे रुळावर रिकाम्या उभ्या असलेल्या रेल्वे गाड्यांना लोखंडी साखळीने बांधून लॉक करण्यात आले आहे. कारण चक्रीवादळाच्या दरम्यान वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे या रेल्वे गाड्या रुळावर एकाच जागी उभ्या राहतील. यामुळे होणारा अपघात रोखता येण्यास मदत होईल, असे देखील रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये ऑरेंज अलर्ट जारी

भारतीय हवामान खात्याचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या शक्तिशाली चक्रीवादळ अम्फानमुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान होऊ शकते. ते म्हणाले, १९९९ मधील वादळानंतर ओडिशातील अम्फान हे दुसरे सुपर चक्रीवादळ आहे. सुपर चक्रीवादळ २० मे रोजी सुंदरबनजवळील दिघा बेट आणि बांगलादेशातील हटिया बेट यांच्यामध्ये धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पश्चिम बंगाल किनारपट्टी आणि ओडिशासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून तेथे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -