घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटLockdown मुळं सर्व बंद आहे; आता फेसबुकवर उघडा दुकान

Lockdown मुळं सर्व बंद आहे; आता फेसबुकवर उघडा दुकान

Subscribe

लॉकडाऊनमुळे मागच्या दोन महिन्यांपासून देशात सर्व व्यवहार बंद आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांचे व्यवहार ठप्प झालेले आहेत. यामुळे दुकानदारांचे मात्र चांगलेच नुकसान होत आहे. सोशल नेटवर्किंग माध्यमातून फेसबुक या सर्वात मोठ्या कंपनीने दुकानदारांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ऑनलाईन शॉप्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दुकानदार आता दोन्ही साईटवर आपले दुकान थाटू शकतात.

फेसबुकने सांगितले की, या नव्या फिचरचा उद्देश असा आहे की, छोटे आणि मध्यम दुकानदार ऑनलाईन यावेत आणि वर्तमान महामारीच्या काळातही त्यांनी स्वतःला स्पर्धेत टिकवून ठेवावे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका लाईव्हच्या माध्यमातून सांगितले की, “कोरोनाच्या महामारीच्या काळात अर्थव्यवस्थेचे पुनर्निर्माण करण्यासाठी ई-कॉमर्स क्षेत्राचा विस्तार करणे गरजेचे आहे. सध्या दुकानदार त्यांचे दुकान किंवा रेस्टॉरंट उघडू शकत नाहीत. मात्र ऑनलाईन ऑर्डर तर घेऊ शकतात.”

- Advertisement -

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ऑनलाईन स्टोअर उघडण्यासाठी दुकानदारांना सध्या प्रेरीत केले जात आहे. यामुळे फेसबुकला पेमेंट गेटवे आणि इतर या व्यवसायाशी जोडल्या गेलेल्या सुविधा उपलब्ध करुन देता येतील. दुकानदार फेसबुकवर आपल्या दुकानाची जाहीरात देखील करु शकतात, यातून फेसबुकचा रेव्हेन्यू वाढणार आहे. तसेच फेसबुक युजर जेव्हा खरेदीचा पर्याय निवडतील तेव्हा त्यांच्याकडून शुल्कही घेण्यात येईल.

फेसबुककडे व्हॉट्सअपची देखील मालकी आहे. त्यामुळे दुकानदार एकदा आपल्या दुकानासह रजिस्टर झाल्यानंतर तो फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर आपली मार्केटिंग करु शकतो. सध्या फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओचा फॉरमट चांगलाच प्रसिद्ध आहे, याचाही वापर करण्याचा विचार फेसबुकतर्फे चालू आहे. लाईव्ह स्ट्रिम चालू असतानाच वस्तूंची विक्री करता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -