घरताज्या घडामोडीयुरियाचा काळाबाजार; कृषी विभाग पथकाच्या छाप्यात सव्वादोन लाखांचा माल जप्त

युरियाचा काळाबाजार; कृषी विभाग पथकाच्या छाप्यात सव्वादोन लाखांचा माल जप्त

Subscribe

अनुदानीत युरिया पलटी मारुन औद्यागिक वापरासाठी विक्री

शेतीसाठी वापरले जाणारे युरिया खत सरकारी अनुदानाच्या किंमतीत खरेदी करुन औद्योगिक वापरासाठी विक्री करुन काळाबाजार करणा-याच्या विरुद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील जळगाव नेऊर येथील मे. सागर कृषी सेवा केन्द्नात शेतक-यांसाठी विक्रीसाठी ठेवलेला अनुदानीत युरिया खत शेतक-यांना न देता युरियाची बॅग बदलून औद्योगिक वापरासाठी विक्री करत असतांना नाशिक कृषी सहसंचालक विभागाच्या पथकाने छापा मारुन २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मालाच्या ‘टेक्निकल ग्रेड युरिया फाॅर इंडस्ट्रि्अल यूज ओन्ली’ या नावाने भरलेल्या १४३ गोण्या जप्त केल्या आहेत. पथकात विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजीत गुमरे, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक किरण विरकर, येवल्याचे कृषी अधिकारी कारभारी नवले आदींनी कारवाई केली. सदर संशयिताच्या विरुद्ध येवला पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५, खत नियंत्रण आदेश १९८५ व भादंबि कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -