घरताज्या घडामोडीCoronavirus: वुहानच्या लॅबमध्ये तीन प्रकारचे व्हायरस सापडले, मात्र कोरोनासारखा नाही

Coronavirus: वुहानच्या लॅबमध्ये तीन प्रकारचे व्हायरस सापडले, मात्र कोरोनासारखा नाही

Subscribe

अमेरिकेने चीनच्या विरोधात कोरोना व्हायरस संबंधित केलेले दावे खोटे असल्याचे वुहान इन्स्टिट्यूटचे संचालक वांग यान्यी यांनी सांगितले.

जगात कोरोना व्हारसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढत आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५४ लाखांहून अधिक झाला आहे. तर ३ लाखांहून अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत. दरम्यान चीनमधील वुहान शहारातील व्हायरलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये वटवाघळात तीन प्रकारचे व्हायरस आढळले. मात्र यापैकी कोरोना व्हायरससोबत काहीही जुळत नाही आहे, अशी माहिती इन्स्टिट्यूटचे संचालक वांग यान्यी यांनी दिली.

वैज्ञानिकांच असं म्हणणं आहे की, कोरोना व्हायरसची उत्पत्ती वुहानमध्ये झाली आहे. यामुळे तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हा व्हायरस वघवाघूळ किंवा सस्तन प्राण्यांच्या माध्यमातून मनुष्यामध्ये पसरला आहे. दरम्यान वुहान इन्स्टिट्यूचे संचालक वांग यान्यी यांनी चिनी मीडिया सीजीटीएनला सांगितले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतरांचे दावे पूर्णपणे खोटे आहेत.

- Advertisement -

१३ मे रोजी वांग यांची मुलाखत घेण्यात आली होती आणि शनिवारी ती प्रसारित करण्यात आली. वांग म्हणाले की, सेंटरमध्ये काही कोरोना व्हायरसची ओळख पटली आहे. आमच्याकडे चार जिवंत व्हायरसचे प्रकार आहेत. त्यापैकी फक्त ७९.८ टक्के सार्स कोव्ह-२ शी जुळत आहेत.

वांग म्हणाले की, ट्रम्प आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पाँपेओ हे दोन महिन्यांपासून वुहान लॅबमधून व्हायरसची उत्पत्ती झाल्याचा आरोप करीत आहेत. ३० डिसेंबरपूर्वी असा व्हायरस अस्तित्त्वात आहे असं आम्हाला माहित नव्हतं. ३० डिसेंबर रोजी व्हायरसचे काही नमुने आमच्याकडे आले. तपासणीनंतर २ जानेवारी जीनोम २ काढले गेले आणि ११ जानेवारीला जागतिक आरोग्य संघटनेला कळविण्यात आले.

- Advertisement -

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पाँपेओ यांनी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीशी कोरोना व्हायरसचा संबंध असल्याचा दावा केला होता. ट्रम्प म्हणाले होते की, आपल्याकडे संबंधित पुरावे आहेत. या लॅबमध्ये कोरोना व्हायरस तयार करण्यात आला. पण त्यांना याबाबत सांगण्यास परवानगी नसल्याचे ते म्हणाले होते. तसंच ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माईक पाँपेओ यांनी चीनवर कोरोना व्हायरस संबंधित माहिती लपवल्याचा आरोप केला आहे. हे सतत व्हायरसची उत्पत्ती चीनच्या वुहान लॅब झाली, असं सांगत आहे. त्याचवेळी हा व्हायरस प्राण्यांपासून मनुष्यात पसरला आहे, असा दावा बहुतेक वैज्ञानिकांनी केला.

चीनच्या वार्षिक संसदेच्या अधिवेशनानंतर पत्रकार परिषदेत वांग म्हणाले,  ‘चीन चौकशीसाठी तयार आहे, परंतु आमचा विश्वास आहे की तपास निःपक्षपाती आणि विधायक असावा. निष्पक्षता म्हणजे ही प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपापासून पूर्णपणे मुक्त पाहिजे, सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचे पालन केले पाहिजे. ‘

अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह जगातील सुमारे १०० देशांनी जागतिक महामारीच्या उत्पत्तीबद्दल स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी केली.


हेही वाचा – लॉकडाऊनमुळे लोकांचे प्राण वाचले नाहीत तर लोकांचे प्राण गेले – नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -