घरलाईफस्टाईल'चिकू' खा तंदरुस्त रहा!

‘चिकू’ खा तंदरुस्त रहा!

Subscribe

'चिकू' खाण्याचे आरोग्यदायी फायदे

फळं खाणं आरोग्यासाठी उत्तम असते. तसेच कडाक्याच्या उन्हापासून शरीराला थंडावा मिळावा म्हणून आहारात गारेगार काकडी, कलिंगड, संत्री, खरबूज आणि चिकू सारख्या फळांचा समावेश केला जातो. यासर्व फळांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. त्यातील चिकू हा छोटा असला तरी त्याचे फायदे फार मोठे आहेत.

अशक्तपणा होतो दूर

- Advertisement -

चिकूमध्ये लोह, फॉस्फरस, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद आणि आद्राता भरपूर प्रमाणात असतात. तसेच ‘अ’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे चिकूचे सेवन केल्याने थकलेल्या, दमलेल्या, अशक्त झालेल्या निरुत्साही व्यक्तीस चिकूचे सेवन लाभदायक ठरते.

नवी ऊर्जा मिळते

- Advertisement -

चिकू मधुर, तृप्तीदायक, दाहनाशक असल्याने श्रम करुन थकवा आलेल्यांनी चिकू खाल्ल्याने नवी ऊर्जा मिळते.

आम्लपित्त

चिकू शीतल आणि दाहशामक असल्याने अरुची, मळमळ आम्लिपित्त, अतिसार या आजारांमध्ये उपयुक्त आहे.

आतड्यांची कार्यक्षमता वाढते

चिकू खाल्ल्याने आतड्यांची कार्यक्षमता वाढून ती सदृढ बनतात.

तोंडाला रुची येण्यासाठी

ताप आलेल्या रुग्णांचे जर तोंड बेचव झाले असेल तर चिकू खावा. यामुळे तोंडाला रुची येते.

शौचास साफ होते

चिक्कूमध्ये असणाऱ्या आद्राता आणि तंतुमय पदार्थामुळे मलावरोध असणाऱ्या रुग्णांनी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्याबरोबर चिकू खाल्लायास शौचास साफ होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -