घरमहाराष्ट्रबोगस ई-पास विक्रीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक

बोगस ई-पास विक्रीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक

Subscribe

कोकणात जाणार्‍यांना दिले सर्वाधिक पास

गावी जाणार्‍या विशेषत: कोकणात जाणार्‍या गरजू व्यक्तींना हेरुन बोगस ई-पासची विक्री करणार्‍या एका टोळीचा डोंगरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन मुख्य आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून मनोज रामू हुंबे नावाच्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत अनेक दिडशेहून अधिक व्यक्तींना बोगस ई-पासा पाच हजारां रुपयांना विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यात कोकणात जाणार्‍यांचा समावेश मोठा आहे. सध्या मनोज हा पोलीस कोठडीत असून त्याच्या इतर सहकार्‍यांचा आता पोलीस तपास करीत असल्याचे एसीपी अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त कार्यालयातून डोंगरी पोलिसांना एक पत्र आले होते, या पत्रात एका मोबाईल क्रमांकावरुन राज्यासह परराज्यात जाणार्‍या गरजू व्यक्तींना काहीजण बोगस पासेस बनवून देत असून त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेत असल्याची माहिती देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती.

- Advertisement -

अविनाश धर्माधिकारी, संदीप भागडीकर यांच्या पथकातील प्रकाश लिंगे व अन्य कर्मचार्‍यांनी या आरोपींचा शोध सुरु असतानाच मनोज हुंबे नावाचा व्यक्ती चेंबूर परिसरात राहतो. तोच त्याच्या इतर सहकार्‍यांसोबत बोगस पासेस बनवित असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर मनोज हुंबे याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने अनेक गरजू लोकांना प्रवास सवलतीचे बोगस पास बनवून दिल्याची कबुली दिली. मुंबईसह नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई आणि पालघर उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून ते पास जारी करण्यात आल्याचे तो अनेकांना सांगत होता. प्रत्येक पासमागे तो गरजू लोकांकडून पाच हजार रुपये घेत होता. त्याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक तसेच आयटी विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -