घरCORONA UPDATEकाही गोष्टी आता पडद्याआडच राहूद्या; त्या शपथविधीवर प्रफुल पटेलांची प्रतिक्रिया

काही गोष्टी आता पडद्याआडच राहूद्या; त्या शपथविधीवर प्रफुल पटेलांची प्रतिक्रिया

Subscribe

“अजित पवारांना सत्तेत सहभागी व्हायचे होते, हे त्या शपथविधीनंतर समोर येतेच. मात्र आता त्यावर अधिक चर्चा करुन काय उपयोग? काही गोष्टी आता पडद्याआडच राहू दिल्या पाहीजेत.”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या त्या शपथविधीबद्दल बोलताना दिली आहे. इंडिया टुडे ग्रुपच्या ई अजेंडा या कार्यक्रमात बोलताना पटेल यांनी सरकार स्थापन करण्याच्या घडामोडीवर भाष्य केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये २३ नोव्हेंबर २०१९ रोजी घडलेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधीचा समावेश राजकीय इतिहासात नक्कीच होईल. या शपथविधीबद्दल अजुनही पुर्ण सत्यता समोर आलेली नाही. मात्र यावर पटेल यांनी भाष्य करताना सांगितले की, “उपमुख्यमंत्री होण्याचा अजित पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय होता. कदाचित तो निर्णय चुकीचा देखील असू शकतो. मात्र आता जे घडून गेले त्याबद्दल चर्चा करुन काही उपयोग नाही. याचा अर्थ त्या गोष्टी लपवण्याचा हेतू नाही. मात्र ती वेळ निघून गेलेली आहे. त्यानंतर अजित पवार यांनी आम्हाला सांगितले की, त्यांना राष्ट्रवादीला नाराज करायचे नव्हते.”

- Advertisement -

पटेल पुढे म्हणाले की, “विधानसभेचा निकाल जाहीर होताच आम्ही विरोधात बसणार हे निश्चित झाले होते. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा भाजप आणि शिवसेनेकडेच होता. मात्र नंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाले आणि राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळेच कदाचित अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी समांतर चर्चा सुरु केली असेल, असा अनुमान आहे.”

हवाई वाहतुक सुरु करणे गरजेचे

कोरोना महामारीच्या काळातही हवाई वाहतुक सुरु करण्याचा निर्णय अगदी योग्य आहे. लोकांच्या प्रवासावर आपण कायमची बंदी घालू शकत नाही. मात्र रेल्वेच्या बाबतीत आपण पाहिले की, तिथे कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. तर दुसऱ्या बाजुला विमान प्रवासात सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. तिथे बस किंवा रेल्वे स्टेशनसारखी गर्दी होत नाही. त्यामुळे हवाई वाहतूक सुरु करण्याचा पर्याय अगदी योग्य असल्याचेही पटेल यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -