घरमहाराष्ट्रमहिलेच्या प्रसूतीनंतर केले आईवर अंत्यसंस्कार; कल्याणमधील डॉक्टरचा हृदयस्पर्शी प्रसंग

महिलेच्या प्रसूतीनंतर केले आईवर अंत्यसंस्कार; कल्याणमधील डॉक्टरचा हृदयस्पर्शी प्रसंग

Subscribe

कोरोनाच्या कठीण काळात आज डॉक्टर हे एखाद्या योद्ध्याप्रमाणे कोरोनाशी लढतही आहेत आणि दुसरीकडे एखाद्या देवदूताप्रमाणे लोकांचे जीवही वाचवत आहेत. कल्याणातही असाच एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला असून पांढऱ्या वेषातील या देवदूताने प्रथम गर्भवती महिलेच्या प्रसूती केली. त्यानंतर आपल्या आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कल्याणातील गर्भवती महिला प्रसूतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात गेली होती. परंतु त्याठिकाणी आयसीयु नसल्याने तिला कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानूसार या महिलेला कुटुंबियांनी कळवा रुग्णालयात नेले. मात्र त्याठिकाणीही तिला दाखल करून घेण्यास रुग्णालयाने नकार दिला. ही माहिती कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना समजताच त्यांनी तातडीने कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधून आयएमएला या महिलेची प्रसूती करण्याची विनंती केली. त्यावर डॉ. प्रशांत पाटील यांनीही तातडीने प्रतिसाद देत आयएमएकडून या महिलेची निःशुल्क प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. मात्र ज्या रुग्णालयात या महिलेची प्रसूती होणार होती. तेथील डॉक्टर अश्विन कक्कड यांच्या आईचे निधन झाले होते. मात्र स्वतःवर कोसळलेले एवढे मोठे दुःख बाजूला ठेवत डॉ. अश्विन कक्कड यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत या महिलेची नॉर्मल डिलिव्हरी केली. त्यानंतर डॉक्टर अश्विन आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी निघून गेले. एकीकडे जन्मदात्रीचा झालेल्या मृत्यू तर दुसरीकडे नव्या बाळाला जन्म देणारी ती अनोळखी माता. अशा कसेाटीच्या प्रसंगात डॉक्टरने आपले कर्तव्य पार पाडले.

- Advertisement -

हेही वाचा – मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती – अमित शहा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -