घरताज्या घडामोडीदेशभरात २४ तासांत ९ हजार ९८७ नवे रुग्ण; ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

देशभरात २४ तासांत ९ हजार ९८७ नवे रुग्ण; ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

Subscribe

देशभरात २४ तासांत ९ हजार ९८७ नवे रुग्ण आढळून आले असून ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या जीवघेणा कोरोना विषाणू थांबायचं नाव घेत नाही आहे. देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ९ हजार ९८७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ६६ हजार ५९८ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये १ लाख २९ हजार २१५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ७ हजार ४६६ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

राज्यात २४ तासांत १०९ जणांचा बळी

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज कोरोनामुळे १०९ जणांचे बळी गेले आहेत. तसेच एका दिवसात २ हजार ५५३ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा ३ हजार १६९ वर पोहोचला असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ झाला आहे. तसेच एका दिवसात १ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत राज्यात एकूण ४० हजार ९७५ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – Corona Live Update: राज्यात २४ तासांत १०९ जणांचा बळी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -