घरCORONA UPDATEमीरा भाईंदरमधील शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकरांचं निधन

मीरा भाईंदरमधील शिवसेना नगरसेवक हरिशचंद्र आमगावकरांचं निधन

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले मीरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक आणि गटनेते हरिशचंद्र आंमगावकर यांचं निधन झालं आहे. ठाण्यातल्या हॉरिझोन हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र. उपचारांदरम्यान आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. हरिशचंद्र आंमगावकर यांची कोरोनाची चाचणी देखील करण्यात आली होती. मात्र, अद्याप त्याच्या अहवालासंदर्भात निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

नगरसेवक हरिशचंद्र आंमगावकर हे मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये २ टर्म नगरसेवक होते. या अगोदर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष पद देखील भूषवले होते. सध्या ते महानगरपालिका शिवसेनेचे गटनेते होते. शिवाय आमदार प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ते ओळखले जात होते.

- Advertisement -

हरिशचंद्र आंमगावकर यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. मात्र, उपचारांनंतर त्या कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. त्यांच्या घरातील इतर सदस्यांची देखील कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -