घरताज्या घडामोडीनीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचा १३५० कोटींचा ऐवज जप्त; ईडीची मोठी कारवाई

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचा १३५० कोटींचा ऐवज जप्त; ईडीची मोठी कारवाई

Subscribe

हाँगकाँग येथील एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामात हा ऐवज ठेवला होता.

कोट्यवधींचा घोटाळा करून भारतातून फरार झालेले आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. बुधवारी ईडीने हाँगकाँग येथील कंपन्यांकडून हिरे, मोती, दागिने जप्त केले असून त्यांची किंमत अंदाजे १ हजार ३५० कोटी रुपये आहे. हा जप्त केलेला ऐवज हाँगकाँग येथील एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामात ठेवला होता. यात पॉलिश हिरे, मोती, चांदीचे दागिने इत्यादींचा समावेश आहे. हा ऐवज मुंबईत परत आणला आहे. ऐवजाचे वजन सुमारे २ हजार ३४० किलो आहे.

- Advertisement -

यापूर्वी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरा उद्योगपती नीरव मोदीला मुंबई विशेष कोर्टाने मोठा झटका दिला होता. कोर्टाने नीरवच्या सर्व मालमत्ता ‘आर्थिक गुन्हेगार फरारी कायद्यानुसार’ जप्त करण्याचे आदेश दिले होता. पीएमएलए कोर्टाने नीरवची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या आदेशानंतर त्याची सर्व मालमत्ता आता भारत सरकारच्या अखत्यारीत आहे.

ईडीने आधी मोदीची संपत्ती जप्त करण्याची कारवाई केली होती. यावर्षी मार्च महिन्यात झालेल्या मालमत्ताच्या लिलावातून ५१ कोटी रुपये मिळाले होते. पंजाब नॅशनल बँकमध्ये १४ हजार कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा करून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी देश सोडून पळून गेले होते.

- Advertisement -

हेही वाचा – देशातील सिंहांची संख्या २९ टक्क्यांनी वाढली; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -