घरताज्या घडामोडीनाशिक शहरात २० नवे रूग्ण पॉझिटिव्ह

नाशिक शहरात २० नवे रूग्ण पॉझिटिव्ह

Subscribe

नाशिक शहरात करोनाने धुमाकूळ घातला असून, गुरूवारी (दि. ११) दिवसभरात २० नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात दोन बाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ७३७ बाधित रूग्ण असून एकट्या नाशिक शहरात ५१६ रूग्ण आहेत. १ हजार ७३७ पैकी ११५२ रूग्ण बरे झाले आहेत. यामध्ये नाशिक ग्रामीण १८८, नाशिक शहर १९६, मालेगाव ७१९ व जिल्ह्याबाहेरील ४९ रूग्णांचा समावेश आहे.
वृंदावन कॉलनी, वैद्यनगर येथील ६१ वर्षीय वृद्ध कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. गीतांजलीनगर, मुंबई आग्रा रोड येथील ४१ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. केळकर हॉस्पिटल समोर, गायकवाडनगर येथील ४५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

वृद्ध महिलेचा मृत्यू
पंडित कॉलनी, गंगापूर रोड येथील वृद्ध महिला ४ जून रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. त्या महिलेचे ११ जून रोजी मृत्यू झाला.

- Advertisement -

५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
गंगापूर रोडवरील एच.पी.टी कॉलेज जवळील ५५ वर्षीय पुरुषाचा ५ जून रोजी उपचारासाठी दाखल झाली होती.त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचे ११ जून रोजी मृत्यू झाला.

शहरातील पॉझिटिव्ह रूग्ण
फुलेनगर 1, पंचवटी 4, कालिकानगर, पंचवटी 2, खर्जुलमळा 1, इंदिरानगर 1, रेणुकानगर 1, हिरावाडी 1, भर्‍हाडवाडी 5.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -