घरताज्या घडामोडीराज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये जम्बो सुविधा सेंटर उभारणार - मुख्यमंत्री

राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये जम्बो सुविधा सेंटर उभारणार – मुख्यमंत्री

Subscribe

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये जम्बो सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. आता नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रात कोविड सेंटर उभारण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर पुण्यात हिंजवडीमध्ये उभारण्यात आलेल्या विप्रोच्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी लोकार्पण करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. सामाजिक बांधिलकीतून विप्रोने ५०४ खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभारले आहे. यामध्ये १८ व्हेंटीलेटर्स, आयसीयू सुविधा आणि इतर सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. सर्व सुविधा असलेल्या दोन रुग्णवाहिकाही विप्रोने दिल्या आहेत. आता हे समर्पित कोविड आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाईल असे देखील ते यावेळी म्हणालेत. दरम्यान या सेंटरसाठी विप्रोने आयटी इमारतीची १. ७ स्क्वेअर फूट जागा दिली आहे. या सेंटरसाठी ५ मे रोजी सामंजस्य करार झाला. त्यानंतर अवघ्या सव्वा महिन्यात विप्रोने ही जागा दिली. विप्रो सामाजिक कार्यात किती वेगाने व दर्जेदार पध्दतीने काम करते ही त्याच उदाहरण आहे असे नमूद करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विप्रोचे रिशद प्रेमजी यांचे आभार मानले.

रुग्णालयात कर्मचारी वर्ग

मोठ्या शहरांमध्ये आम्ही जम्बो सुविधा निर्माण करीत आहोत असे सांगत ते म्हणाले मुंबईत बीकेसीमध्ये पंधरा दिवसात देशातील पहिले फिल्ड हॉस्पिटल उभारले. त्यात एक हजार खाटांची सोय आहे. त्याच्या बाजूलाच दुसरे हॉस्पिटल उभारले जात आहे. गोरेगाव येथे नेसको येथे जम्बो सेंटर सुरू झाले आहे. नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रातील कोविड सेंटर सुरु होत आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. मात्र फिल्ड हॉस्पिटल्स उभारून चालणार नाही तर त्यात काम करायला डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ लागणार आहे. तो देखील सर्व माध्यमांतून आम्ही तयार करीत आहोत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -