घरताज्या घडामोडीनाशकात प्रभाग १०, ११, १२ मध्ये मंगळवारी पाणी येणार नाही

नाशकात प्रभाग १०, ११, १२ मध्ये मंगळवारी पाणी येणार नाही

Subscribe

शिवाजीनगर जल शुद्धीकरण केंद्राला जोडणारी पाईप लाईन दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने येत्या मंगळवारी (दि. १६) प्रभाग क्रमांक १०, ११ आणि १२ मध्ये पाणीपुरवठा होणार नाही असे महापालिका प्रशासनाने कळवले आहे. तसेच बुधवारी (दि. १७) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

शिवाजीनगर जल शुद्धीकरण केंद्राला जोडणारी पाईप लाईन दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने येत्या मंगळवारी (दि. १६) प्रभाग क्रमांक १०, ११ आणि १२ मध्ये पाणीपुरवठा होणार नाही असे महापालिका प्रशासनाने कळवले आहे. तसेच बुधवारी (दि. १७) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

सातपुर विभागसातपुर विभागामधील शिवाजी नगर जल शुद्धीकरण केंद्र येथून प्रभाग क्रमांक १० व ११ तसेच नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक १२ मधील जलकुंभ भरणे व पाणी वितरण करीता १२०० मि. मी. व्यासाची पी.एस.सी. पाइप लाइन द्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. ही मुख्य पाइप लाइन ही नासर्डी नदी जवळ व अशोक नगर पोलिस चौकी जवळ लिकेज झाली आहे. तिचे दुरूस्तीचे काम तत्काळ करणे आवश्यक असल्याने सातपुर व नाशिक पश्चिम विभागातील खालील नमूद ठिकाणी मंगळवारी (दि. १६) सकाळी ९ वाजे नंतरचा व संध्याकाळचा पाणी पुरवठा पुढील भागात होऊ शकणार नाही. बुधवारी(दि. १७) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल.

- Advertisement -

या भागात येणार नाही पाणी-

प्रभाग क्र.१० (भागश:)- सातपुर कॉलनी, अशोक नगर, जाधव संकुल, हाऊसिंग कॉलनी.
प्रभाग क्र.११ (भागश:)– सातपुर गाव, स्वारबाबा नगर, महादेववाडी, जे.पी.नगर, मळे विभाग, संतोषीमाता नगर, गौतम नगर, सातपुर कॉलनी, समतानगर, विनायक संकुल, खोडे पार्क, आठ हजार कॉलनी, कृष्णनगर, वीस हजार कॉलनी, शिवकॉलनी, सुयोजित कॉलनी, कामगार नगरचा काही भाग विकास कॉलनी.

नाशिक पश्चिम विभाग : प्रभाग क्र.१२ (भागश:) – लवाटे नगर, संभाजी चौक, उषा किरण सोसायटी, पत्रकार कॉलनी, तिडके कॉलनी, कालिका मंदिर मागील भाग, सहवास नगर, राहुल नगर, मिलिंद नगर, मातोश्री नगर, महेश नगर, राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र परिसर, वनविहार कॉलनी, संतकबीर नगर, पारिजात नगर, समर्थ नगर महात्मानगर परिसर.

- Advertisement -

 

 

नाशकात प्रभाग १०, ११, १२ मध्ये मंगळवारी पाणी येणार नाही
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -