घरताज्या घडामोडीनाशिकच्या महापौरांच्या प्रभागात पावसाळी गटारींचा फज्जा

नाशिकच्या महापौरांच्या प्रभागात पावसाळी गटारींचा फज्जा

Subscribe

महापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये सहा महिन्यांपूर्वी पावसाळी गटार योजनेचे काम करण्यात आले खरे; परंतु यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात या योजनेचे पितळ उघडे पडले आहे. अशोका मार्गावरी घरांमध्ये अक्षरश: घरांमध्ये पाणी फिरले आहे. महापौरांच्या प्रभागाची अशी स्थिती आहे तर शहरातील अन्य भागांची किती हाल असतील याचा विचार न केलेलाच बरा.

महापौर सतीश कुलकर्णी यांच्या प्रभाग क्रमांक १४ मध्ये सहा महिन्यांपूर्वी पावसाळी गटार योजनेचे काम करण्यात आले खरे; परंतु यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात या योजनेचे पितळ उघडे पडले आहे. अशोका मार्गावरी घरांमध्ये अक्षरश: घरांमध्ये पाणी फिरले आहे. महापौरांच्या प्रभागाची अशी स्थिती आहे तर शहरातील अन्य भागांची किती हाल असतील याचा विचार न केलेलाच बरा.

- Advertisement -

शहरात काही वर्षांपूर्वी ४०० कोटी रुपये खर्च करुन पावसाळी गटार योजनेचे काम करण्यात आले. मात्र हा पैसा पाण्यात गेल्याचा अनुभव त्यानंतर आलेल्या पावसानंतर आला. या योजनेनंतरही शहरातील ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचल्याचे दिसून आले. नवीन नाशिक, पंचवटी, जुने नाशिक आदी भागांमध्ये घरांमध्येही पाणी शिरल्याच्या अनुभव येत होता. या योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी त्यांच्या प्रभागात नव्याने पाईप लाईन टाकली. मात्र ती योग्य ठिकाणी न टाकल्याने हे काम होऊनही काही उपयोग झालेला दिसत नाही. शनिवारी (दि.१३) झालेल्या पावसात अशोका मार्ग परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. पाईप लाईन टाकतानाच हे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले होते. परंतु त्याची दखल घेण्यात न आल्याने पाईप लाईनवर करण्यात आलेला पैसा अक्षरश: पाण्यात गेला आहे. ही नवीन पावसाळी गटार लाईन टाकण्यापूर्वीही अशीच व्यवस्था होती. मग इतका खर्च झाला त्याचा काय उपयोग असा प्रश्न आता परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. महापौरांच्या प्रभागाचे महापालिका प्रशासनाने इतके हाल केले आहेत, तर अन्य भागांचे किती हाल असतील असेही बोलले जात आहे.

मी अशोका मार्ग परिसरातील कल्पतरु नगरमधील लेन नंबर ३ मध्ये राहतो. पाच या भागात पाच ते सहा महिन्यांपूर्वी पावसाळी गटारींचे काम करण्यात आले. पाणी कोठून कोठे वाहते याविषयी त्यावेळी संबंधित इंजिनीअर्सला सांगूनही त्यांनी कामात सुधारणा केली नाही. त्यामुळे आजच्या पावसात अक्षरश: घरांमध्ये पाणी शिरले. इमारतींमध्ये दोन-तीन पायर्‍या पाण्यात बुडाल्या. ही नवीन लाईन टाकण्यापूर्वीची परिस्थिती आजपेक्षा बरी होती. शिवाय अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या मागे असलेला नाला नेहमीच ओव्हर फ्लो होतो. हा नाला बर्‍यापैकी बुजला गेलाय. त्यामुळे पाणी घरांमध्ये शिरते. 
अशोक वरखेडे, परिसरातील रहिवासी

नाशिकच्या महापौरांच्या प्रभागात पावसाळी गटारींचा फज्जा
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -