घरताज्या घडामोडीपाणी तुंबण्यावर ‘स्मार्ट’ तोडगा

पाणी तुंबण्यावर ‘स्मार्ट’ तोडगा

Subscribe

सराफ बाजार, हुंडीवाला लेन, दहीपुल परिसराचा स्मार्ट सिटीत समावेश

शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील बाजारपेठांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले. येथील दुकानांमध्येही पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले.  पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज या भागाची पाहणी करत पाहणी करत व्यापार्‍यांशी चर्चा केली. तुंबणार्‍या पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात या भागाचा सामावेश केला जाईल असे आश्वासन भुजबळ यांनी व्यावसायिकांना दिले. यासंदर्भात बुधवारी महापालिका आयुक्तांसमवेत व्यावसायिकांची बैठक घेण्यात येउन त्यांच्या सूचना जाणून घेण्यात येणार आहे.

सोमवारी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने सराफ बाजार, भांडीबाजार, दहीपुल, हुंडीवाला लेन परिसरात पावसाचे पाणी साचले. येथे नाले तुंबल्याने हे पाणी व्यावसायिकांच्या दुकानात शिरल्याने मोठे नुकसान झाले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या भागाचा दौरा करत पाहणी केली. दरवर्षी पावसाळयात अशा प्रकारे दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी व्यावसायिकांनी केली. याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून तज्ञांच्या मदतीने येथील ड्रेनेज तुंबण्याच्या समस्येवर मार्ग काढला जाईल असे आश्वासन भुजबळ यांनी दिले. याबाबत आराखडा तयार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. बुधवार (दि.१७) रोजी व्यापारी, स्मार्ट सिटीचे अधिकारी बैठक घेउन चर्चा करतील व व्यापार्‍यांच्या सुचना जाणून घेउन हा प्रश्न निकाली काढतील असे भुजबळ यांनी सांगितले. यावेळी महापालीका उपविभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी, स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी प्रकाश थविल, पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी, नगरसेवक गजानन शेलार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते.

- Advertisement -

करोनाचा धोका कायम
शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधिंतांची सख्या वाढत असून त्यावर प्रतिबंध करण्यासाठी नागरीकांनी स्वत: जागृत राहून काळजी घ्यावी. स्वत:च्या आरोग्याची सुरक्षा ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे शहरात बाजारपेठेच्या ठिकाणी गर्दी वाढत आहे. परंतु लॉकडाऊन जरी शिथिल झाला असला, तरी कोरोना अजुन संपलेला नाही हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. अगदी गरज असेल तरच बाहेर पडावे. विनाकारण फिरणे गर्दी करणे टाळावे, प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझर यांचा वापर कटाक्षाने करावा. तसेच पोलीस यंत्रणेने सुद्धा मास्क न घालणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जरी असली तरी ती एक ठराविक संख्येपर्यंत वाढून नंतर हा वाढता आलेख आपोआपच खाली येईल असा आशावादही पालकमंत्री भुजबळ यांनी व्यक्त केला.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून तोडगा काढणार
2008 साली सुद्धा अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली होती. अलीकडच्या काळात या भागात पावसामुळे नियमितपणे पाणी साठतांना दिसते.त्यामुळे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून, महापालिकेच्या सन्मवयातून तज्ञ अभियंते यांच्या सल्ल्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल.
छगन भुजबळ, पालकमंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -