घरCORONA UPDATEभिवंडीत गुरुवारपासून पंधरा दिवसांचा विशेष लॉकडाऊन

भिवंडीत गुरुवारपासून पंधरा दिवसांचा विशेष लॉकडाऊन

Subscribe

महापौर प्रतिभा पाटील यांनी सभागृहाच्या संमतीने येत्या गुरुवारपासून पंधरा दिवसांकरीता विशेष लॉकडाऊन जाहीर करीत असल्याची घोषणा केली.

१ जूनपासून सुरू झालेल्या अन लॉकडाऊन काळात भिवंडी शहरात अचानक कोरोना रुग्ण वाढ होण्यास सुरुवात होऊन शहरातील परिस्थिती भयावह झाल्याने महानगरपालिका सभागृहात मंगळवारी आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सोशल डिस्टसिंगचे पालन करीत कोरोना परिस्थितीवर तीन तास झालेल्या चर्चेनंतर पिठासन अधिकारी महापौर प्रतिभा पाटील यांनी सभागृहाच्या संमतीने येत्या गुरुवारपासून पंधरा दिवसांकरीता विशेष लॉकडाऊन जाहीर करीत असल्याची घोषणा केली. या विशेष महासभेत बहुतांश नगरसेवकांनी शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत असलेल्या वाढीस प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार असल्याचा आरोपाचा भडिमार केला.

नगरसेवक फराद(बाबा) बहाउद्दीन यांनी शहरातील भीषण वास्तव सभागृहात मांडताना शहरातील कोरोना मृतांची संख्या प्रशासन लपवत असल्याचा आरोप करीत शहरातील विविध कब्रस्तानमध्ये मागील पाच दिवसात किमान २५० कोरोना बधितांचा मृत्यू झाल्याचा गौप्यस्फोट केला. रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याबाबत तर काही रुग्णवाहिका चालकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याची माहिती सभागृहा समोर नगरसेवकांनी मांडली।

- Advertisement -

शहरातील रुग्णांसाठी जी रुग्णालये ताब्यात घेतली त्यापैकी एकही रुग्णलयात सुस्थितीत सुरू नसून ताडाळी येथे मनपाने खासगी कोविड रुग्णालय म्हणून सुरू केलेले वऱ्हाळ देवी रुग्णालय त्वरित बंद करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली.

तर सभागृह नेता विलास पाटील व नगरसेवक संतोष शेट्टी यांनी आमदार रईस शेख यांनी आयएसआय आयुक्त नियुक्तीच्या मागणीचा समाचार घेताना ते जेथे राहतात तेथे त्यांनी काही केले नाही मुंबई महानगपालिकेत ते नगरसेवक आहेत तेथे पाच आयएसआय दर्जाचे अधिकारी असताना परिस्थिती हाता बाहेर गेली त्यांनी महानगरपालिकेला फुकटचे सल्ले देण्याचा प्रयत्न करू नये, असा घणाघात केला .

- Advertisement -

या सर्व चर्चेला उत्तर देताना आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी प्रशासन चोवीस तास सतर्क राहून कार्यरत आहे काही चूका मागील काळात झाल्या असतील त्या नक्की सुधारून लोकप्रतिनिधी व शहरातील नागरिकांच्या सहकार्यातून कोरोना वर मत करण्यासाठी ३५० बेडचे रुग्णालय उभारणीस लवकर सुरुवात करीत असल्याचे सांगितले.

तर महापौर प्रतिभा पाटील यांनी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वानीच काळजी घेणे गरजेचे असल्याने त्याच साठी फक्त औषध व्यतिरिक्त दूध किराणा ठराविक वेळे साठी उघडे ठेवून, तर तिनबत्ती भाजीमार्केट बंद ठेवून पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन लावला जाणार असल्याची घोषणा केली व याबाबत पोलीस व जिल्हा प्रशासना सोबत राज्य सरकारला कळविण्यात आल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -