घरताज्या घडामोडीप्रधानमंत्रीजी कुछ तो बोलो, जनतेला खरं ऐकायचं आहे - राऊत

प्रधानमंत्रीजी कुछ तो बोलो, जनतेला खरं ऐकायचं आहे – राऊत

Subscribe

चिनी सैनिकांसोबत सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात झालेल्या संघर्षामध्ये भारताचे २० सैनिक शहीद झाले. यात भारताच्या कर्नल हुद्द्याच्या लष्करी अधिकाऱ्याचाही समावेश आहे. यामुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे. मात्र या भारत- चीन संघर्षानंतर शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी मोदी सरकारवर ट्वीट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

- Advertisement -

संजय राऊत यांनी ट्विट करत अनेक प्रश्न सरकारला विचारले आहेत, राऊत ट्विटमध्ये म्हणतात की, चीनला भारताकडून चोख प्रत्युत्तर कधी मिळणार?  गोळीबारा शिवायच २० सैनिकांचा मृत्यू कसा झाल? चीनचे नेमके किती जवान मारले गेले? चीन भारताच्या जमीनीत घुसलं आहे का? संपूर्ण देश तुमच्या बरोबर आहे. पण नेमकं सत्य काय आहे. देशाला खरं ऐकायचं आहे? प्रतंप्रधान तुम्ही शुर आहात, योध्दा आहात. तुमच्या नेतृत्त्वाखाली भारत चीनला चोखला प्रत्यृत्तर देईल अशा आशयाचे ट्वीट संजय राऊत यांनी ट्विट करत सरकारने प्रश्न चिन्ह विचारले आहेत.

- Advertisement -

गलवाण खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हाणामारीत भारताचे २० सैनिक हुतात्मा झाल्याचं आता स्पष्ट झालंय. भारत-चीन संघर्षात चीनच्या सैनिकांचीही मोठी हानी झाली असून भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षात ठार झालेत.


हे ही वाचा – ‘मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान’,शहीद कर्नल यांच्या आईची प्रतिक्रीया!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -