घरदेश-विदेशपंतप्रधान आज उद्धव ठाकरेंसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

पंतप्रधान आज उद्धव ठाकरेंसह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी व पुढील योजना ठरवण्यासंदर्भात राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी शिथिल करण्यात आला आहे. अनलॉक १ जाहीर करून दोन आठवड्यांचा कालावधी झाला आहे. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी व पुढील योजना ठरवण्यासंदर्भात राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहे. दोन टप्प्यात ही बैठक असून, पहिल्या दिवशी म्हणजे काल मंगळवारी २१ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज (१७ जून) महाराष्ट्रासह उर्वरित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी चर्चा करणार आहेत.

ज्या राज्यांमध्ये कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा राज्यांचे मुख्यमंत्री आजच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंतप्रधान मुंबई, पुणे, नागपूरसह उर्वरित भागातील कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा करण्याची शक्यता आहे. शिवाय, देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईतील परिस्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काही सूचना मुख्यमंत्र्यांना करू शकतात. त्याचबरोबर सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी माहिती देण्यात येणार आहे. आज दुपारी तीन वाजता ही बैठक होणार आहे. कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वेळा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – व्यापारी महासंघाचा ५०० मेड इन चायना वस्तूंवर बहिष्कार


मंगळवारी झालेल्या बैठकीत मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंगळवारी देखील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. “आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की, कोरोनाला रोखायचं आहे. त्याचा प्रसार रोखायचा आहे. यामुळे आपली अर्थव्यवस्था खुली होत जाईल. कार्यालये उघडतील. बाजारपेठा खुल्या होतील. वाहतुकीची साधने सुरू होतील आणि तितक्याच रोजगाराच्या नव्या संधी आपल्यासाठी निर्माण होतील, असं पंतप्रधान म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -