घरCORONA UPDATEश्री संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांची पालखी हेलिकॉप्टरने नेण्याची मागणी!

श्री संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज यांची पालखी हेलिकॉप्टरने नेण्याची मागणी!

Subscribe

श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या ३० जून रोजी आषाढी एकादशीला बसद्वारे नेल्यास पादुकांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पालख्या या हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. अंतिम निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असा असू शकतो मार्ग

विमानाद्वारे पालख्या नेण्याचा मार्ग स्विकारल्यास लोहगाव विमानतळावरून सोलापूर येथील विमानतळावर पालख्या न्याव्या लागणार आहेत. त्यानंतर पंढरपूर पर्यंत पोहचण्यासाठी हेलिकॉप्टर किंवा बसचा पर्याय निवडावा लागणार आहे. . सोलापूर शहर ते पंढरपूर हे अंतर सुमारे ८० किलोमीटर आहे. त्यामुळे विमानाऐवजी हेलिकॉप्टरचा पर्याय स्वीकारणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे १२ जून तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे १३ जूनला ५० भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळे झाले आहेत. पालख्यांचे प्रस्थान झाल्यानंतर यंदा श्री संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमध्ये मुक्कामी असून, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीमध्ये आहे. ३० जून रोजी पालख्या पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मंदिर परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या कोणत्याही दिंड्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – महत्त्वाची बातमी! चिनी वस्तूंना भारतातून हद्दपार करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -