घरदेश-विदेशMP: PPE किट परिधान करून पॉझिटिव्ह आमदार राज्यसभा निवडणुकीचं मतदान करण्यासाठी हजर!

MP: PPE किट परिधान करून पॉझिटिव्ह आमदार राज्यसभा निवडणुकीचं मतदान करण्यासाठी हजर!

Subscribe

जेव्हा मतदान करून आल्यानंतर हे आमदार परत आले तेव्हा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला.

देशातील ८ राज्यांमधील १९ जागांवर राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. मध्य प्रदेशात आज तीन जागांसाठी मतदान होत आहे, दरम्यान शुक्रवारी दुपारी एक विशेष पाहायला मिळाले. ते म्हणजे कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आलेले कॉंग्रेसचे आमदार मतदान करण्यासाठी पीपीई किट घालून दाखल झाले होते.

- Advertisement -

शुक्रवारी सकाळपासूनच कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करीत आहेत. परंतु दुपारी एक वाजेच्या सुमारास कॉंग्रेसचे एक आमदार मतदान करण्यासाठी पीपीई किट घालून विधानसभा इमारतीत हजर झाले. या आमदाराची काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात आली होती आणि त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

सावधगिरी बाळगून आमदार मतदान करण्यास हजर

कोरोनामध्ये संक्रमित झालेल्या किंवा कोरोनाची लक्षणे असलेल्या कोणत्याही व्यक्तीस सुरक्षित रहावे लागते आणि त्याने स्वत:ला अलग ठेवले पाहिजे. परंतु मतदानामुळे सर्व सावधगिरी बाळगून आमदार येथे दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. जेव्हा मतदान करून आल्यानंतर हे आमदार परत आले तेव्हा संपूर्ण परिसर सॅनिटाइज करण्यात आला. मतदानाची जागा आणि मुख्य गेटही सॅनिटाइज केले गेले जेणेकरून दुसर्‍या कोणालाही याचा धोका होऊ नये.

- Advertisement -

राज्यसभा निवडणुकांची लक्षवेधी लढाई

दरम्यान, मध्य प्रदेशमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. येथे एकूण चार उमेदवार रिंगणात आहेत, भाजप आणि कॉंग्रेसने प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. मध्य प्रदेशात भाजपाकडे ज्योतिरादित्य सिंधिया आहेत, तर कॉंग्रेसने दिग्विजय सिंग यांना उमेदवारी दिली आहे.

मध्य प्रदेश व्यतिरिक्त गुजरात आणि राजस्थान येथे यावेळी जोरदार लढत सुरू आहे, तेथे एकूण जागांपेक्षा पक्षांनी जास्त उमेदवार उभे केले आहेत. गुजरातमधील चार जागांवर पाच उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत तर राजस्थानमध्येही राज्यसभेत तीन जागा आहेत आणि चार उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -