घरताज्या घडामोडीCoronavirus: 'या' १० देशांपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाचे अधिक बळी

Coronavirus: ‘या’ १० देशांपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाचे अधिक बळी

Subscribe

अनेक बड्या देशांपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा अधिक आहे.

महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित आकड्याने बांगलादेश, कॅनडा, साउथ आफ्रिका आणि चीन सारख्या देशांना मागे टाकले आहे. तसेच अनेक देशांपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३५ हजार ७९६ असून मृतांचा आकडा ६ हजार २८३वर पोहोचला आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, चिली, तुर्की, पाकिस्तान, सौदी अरेबिया, बांगलादेश, साउथ आफ्रिका, कतार, चीन, कोलंबिया, बेलारूस, स्वीडन या १० देशांपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहे. आतापर्यंत जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ९२ लाख ९ हजार९३०वर पोहोचला आहे. तर यापैकी ४ लाख ७४ हजार ७९७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच आतापर्यंत ४९ लाख ५६ हजार ९८३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रापेक्षा या १० देशांमध्ये मृतांचा आकडा कमी

चिली : कोरोनाबाधित – २४६,९६३ – मृत्यू – ४,५०२
तुर्की : कोरोनाबाधित – १८८,८९७ – मृत्यू – ४,९७४
पाकिस्तान : कोरोनाबाधित – १८५,०३४ – मृत्यू – ३,६९५
सौदी अरेबिया : कोरोनाबाधित – १६१,००५ – मृत्यू – १,३०७
बांगलादेश : कोरोनाबाधित – ११९,१९८ – मृत्यू – १,५४५
साउथ आफ्रिका : कोरोनाबाधित – १०१,५९० मृत्यू – १,९९१
कतार : कोरोनाबाधित – ८८,४०३ – मृत्यू – ९९
चीन : कोरोनाबाधित – ८३,४१८ – मृत्यू – ४,६३४
कोलंबिया : कोरोनाबाधित – ७१,१८३ – मृत्यू – २,३१०
बेलारूस : कोरोनाबाधित – ५९,०२३ – मृत्यू – ३५१
स्वीडन : कोरोनाबाधित – ५८,९३१ – मृत्यू – ५,१२२


हेही वाचा – Corona Update: देशात २४ तासांत १४ हजार ९३३ नवे कोरोनाचे रुग्ण, ३१२ जणांचा मृत्यू!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -