घरताज्या घडामोडीअर्जून कपूर ऐवजी सुशांत दिसला असता 'त्या' चित्रपटात,आता ट्विटरवर होतोय ट्रोल!

अर्जून कपूर ऐवजी सुशांत दिसला असता ‘त्या’ चित्रपटात,आता ट्विटरवर होतोय ट्रोल!

Subscribe

चेतन भगत यांचा जुना ट्विट पुन्हा ट्रेण्ड होत असून नेटकरी अर्जुन कपूर व घराणेशाहीवर टीका करत आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आतम्हत्येनंतर सोशल मीडियावर बॉलिवूडच्या घराणेशाहीवरून नवा वाद सुरू झाला आहे. प्रत्येकजण आता बॉलिवूडमध्ये होणाऱ्या घराणेशाहीवर बोलत आहे. सध्या चेतन भगत यांचं जुनं ट्विट व्हायरल होत आहे. चेतन भगत यांनी ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटावेळी केलेलं हे ट्विट होतं.

- Advertisement -

हे ट्विट व्हायरल होण्या मागचं कारण म्हणजे या चित्रपटासाठी आधी सुशांत सिंह राजपूतची निवड झाल्याचं समजतंय. आणि प्रत्यक्षात चित्रपटात अर्जून कपूर दिसला. यासंदर्भातील चेतन भगत यांचा जुना ट्विट पुन्हा ट्रेण्ड होत असून नेटकरी अर्जुन कपूर व घराणेशाहीवर टीका करत आहेत.

- Advertisement -

सुशांतने मोहित सुरीची भेट घेतली होती आणि माधव झा या भूमिकेसाठी त्याने सर्व तयारीसुद्धा केली होती. “सुशांतने मेहनतीने आणि कामाने मी फार प्रभावित झालो. माझ्या चित्रपटासाठी मुख्य अभिनेता मिळाला”, अशा शब्दांत मोहित सुरीने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आनंद व्यक्त केला होता.

मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सुशांत सिंह राजपूतची निवड झाली, असं ट्विट चेतन भगतने केलं होतं. मात्र ऐनवेळी सुशांतची जागा अर्जुन कपूरने का घेतली. मात्र यामागचं कारण अद्याप अस्पष्टच आहे. याचबरोबर ‘फितूर’ या चित्रपटासाठीही आधी सुशांतची निवड झाली होती, अशा आशयाचे ट्विटही व्हायरल होऊ लागले आहेत. नंतर ‘फितूर’मध्ये आदित्य रॉय कपूरने मुख्य भूमिका साकारली. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


हे ही वाचा – बलात्काराची शिक्षा भोगून परत आलेल्या बापाने केला मुलीवरच बलात्कार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -