घरUncategorizedआयएनएस विक्रांतमधील मायक्रो प्रोसेसर चोरणाऱ्या दोघांना अटक 

आयएनएस विक्रांतमधील मायक्रो प्रोसेसर चोरणाऱ्या दोघांना अटक 

Subscribe

पहिल्या स्वदेशी लढाऊ विमान वाहक आयएनएस विक्रांतमधून मायक्रो-प्रोसेसरची चोरी आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीला एनआयए अटक केली. हा मायक्रो प्रोसेसर ज्या व्यक्तीकडून जप्त केला, त्याने तो मायक्रो प्रोसेसर ऑनलाइन खरेदी केला होता. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबर २०१९ मध्ये विक्रांतमध्ये बसविण्यात आलेल्या चार संगणकांची तोडफोड करुन पाच मल्टी-फंक्शनल कन्सोलमधून पाच मायक्रो-प्रोसेसर चोरीस गेले.

बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात सुमित सिंग आणि दया राम यांना राजस्थानच्या हनुमानगड येथून चौकशी एजन्सीने १० जून रोजी अटक केली. एनआयएने २६ सप्टेंबर २०१९ रोजी राष्ट्रीय सुरक्षा संबंधित संवेदनशील डेटा असलेल्या हार्ड डिस्कमुळे त्याची तपासणी सुरू केली. आयएनएस विक्रांतच्या संपूर्ण आधुनिकीकरणावर १९९९ साली काम सुरू झाले आणि फेब्रुवारी २००९मध्ये ते पूर्ण झाले. फेब्रुवारी २०२१ मध्ये याची समुद्री चाचण्या सुरू होईल आणि २०२३ पर्यंत हे जहाज नव्या स्वरूपात नौसेनेच्या ताफ्यात सामील होणार आहे. याची किंमत २० हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
कोचीन शिपयार्डमधून देशातीलअशा या पहिले स्वदेशी विमान वाहक आयएनएस विक्रांतचे डिजिटल डिव्हाइस गायब झाले होते. त्यानंतर राष्ट्रीय एजन्सींने याची चौकशी सुरु केली. कोचिन शिपयार्डमध्ये या जहाजावर आधुनिकीकरणाचे काम होत असताना हि चोरी झाली आहे, असे एनआयएचे म्हणणे होते. केरळचे पोलिस प्रमुख लोकनाथ बहेरा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक तयार केले गेल्याची सांगितले होते. कोची शहर अतिरिक्त पोलिस आयुक्त केपी फिलिप यांनी शिपयार्डच्या अधिकार्यानी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सोमवारी गुन्हा दाखल करण्यात केला होता.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -