घरताज्या घडामोडीमुंबई एअरपोर्टमध्ये ७०५ कोटींचा गैरव्यवहार, 'जीव्हीके'च्या रेड्डी पिता पुत्रावर गुन्हा दाखल

मुंबई एअरपोर्टमध्ये ७०५ कोटींचा गैरव्यवहार, ‘जीव्हीके’च्या रेड्डी पिता पुत्रावर गुन्हा दाखल

Subscribe

सेंट्रल ब्युरो ऑफ इनव्हेस्टिंगेशन (सीबीआय) ने जीव्हीके ग्रुप कंपनीचे चेअरमन कृष्ण रेड्डी गुणुपती आणि त्यांचा मुलगा जी व्ही संजय रेड्डी यांना एअरपोर्टच्या कारभारात ७०५ कोटी रूपयांची अनियमितता आढळल्यासाठी अटक केली आहे. जी व्ही संजय रेड्डी हे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल)चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया (एएआय) लिमिटेडने जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडसोबत संयुक्तिक करार केला होता. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपअंतर्गत जीव्हीके ग्रुपला मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडला मुंबई एअरपोर्टचे अपग्रेडेशन आणि देखभाल दुरूस्तीचे काम मिळाले होते. याआधी ४ एप्रिल २००६ रोजी एएआयने एमआयएएल सोबत हा करार केला होता. पण जीव्हीके ग्रुपच्या एमआयएलमधील प्रमोटर्सने काही अज्ञात एएआयच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने या निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे. या एजन्सीने २०१७-१८ मध्ये नऊ कंपन्यांना बोगस पद्धतीने काम देण्याचा बनाव करत ३१० कोटी रूपयांचा तोटा केल्याचे उघड झाले आहे. तर जीव्हीकेने एमआयएएलच्या ३९५ कोटी रूपयांच्या निधीचा वापर त्यांच्या समुहातील कंपन्यांना निधी देण्यासाठी केल्याचे उघड झाले आहे. हा निधी एमआयएएलमार्फत राखीव स्वरूपात ठेवण्यात आला होता. मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच समुहातील कंपन्यांना मोठा पगार देत तसेच अवाजवी खर्च केल्याने एएआयला तोटा झाल्याचे या संपुर्ण प्रकरणात उघड झाले आहे. सीबीआयकडून इतर ९ कंपन्यांविरोधात तसेच एएआयमधील अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा झाल्याचे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -