घरताज्या घडामोडीचिंचोलीत बिबट्या जेरबंद

चिंचोलीत बिबट्या जेरबंद

Subscribe

नाशिकरोड । चिंचोली (ता. सिन्नर) येथे स्मशानभूमीच्या बाजूला लावलेल्या पिंज-यात बुधवारी (दि. २२) पहाटे बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. या भागात हा चौथा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

दारणा नदी काठच्या गावातील चार बळी व अनेक हल्ले करणा-या बिबबट्यांनी धुमाकुळ घातला आहे. नाशिक, सिन्नर, निफाड, येवला, आदी पथकांसोबत मुंबई येथील संजय गांधी राष्टीय उद्यानातील दोन वेगवेगळ्या पथकांनी विविध प्रकारचे प्रयोग करुन जेरबंद करण्यासाठी कंबर कसली होती. गेल्या १५-२० दिवसांत चार बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
सिन्नर तालुक्यातील चिंचोली गावात गेल्या कित्येक दिवसांपासून बिबट्यांचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशत होती. गावाला लागूनच असलेल्या स्मशानभूमी परिसरात बिबट्यांचा वावर असल्याच्या तक्रारी पोलीस पाटलांनी सिन्नर वनविभागाचे अधिका-यांकडे केल्या नंतर मंगळवारी (दि.२१) दुपारी  महादू लहानू सानप यांच्या गट नंबर ३१ या शेतात पिंजरा लावला होता. बुधवारी (दि२२) पहाटे पिंज-याचा दरवाजा बंद झाल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलीस पाटील मोहन यशवंत सांगळे, जि. प. सदस्य संजय सानप, राजाराम नवाळे यांनी वनविभागाचे प्रवीण सोनवणे यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या सुचने प्रमाणे राजाराम उगले, साळवे यांनी बिबट्या ताब्यात घेऊन सिन्नरला नेण्यात आला आहे. दरम्यान या भागात अद्यापही दोन किंवा अधिक बिबटे असल्याने वनविभागाने अधिक पिंजरे लावण्याची मागणी जि. प. सदस्य संजय सानप यांनी केली.
Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -