घरताज्या घडामोडीनालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांचा गोंधळ, रेल्वेने प्रवासाची केली मागणी

नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांचा गोंधळ, रेल्वेने प्रवासाची केली मागणी

Subscribe

नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाश्यांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून गोंधळ घातला आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने अनेक कार्यालयं सुरू झाली आहेत. लोकलने प्रवास करण्याची मुभा नसल्याने अनेक कर्मचारी, लोक एसटीने मुंबईपर्यंत प्रवास करत आहेत. पण सकाळी एसटी सेवा आणि एसटी स्टँड बंद असल्या कारणाने प्रवासी संताप्त झाले आहेत. यावेळी प्रवासी थेट ट्रॅकवर उतरले. यावेळी प्रवाशांनी आम्हाला लोकलने प्रवास करू देण्याची मागणी केली.

नालासोपाऱ्यात संतप्त प्रवाशांचा रेल्वे ट्रकवर उतरून गोंधळ

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, July 21, 2020

- Advertisement -

एसटी बंद असल्यामुळे झाला गोंधळ

नालासोपारा येथील लोक सकाळी एएसटी स्टँडवर पोहोचले असता सेवा बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांचा संताप झाला आणि त्यांनी थेट रेल्वे स्टेशन गाठलं. पोलिसांनी यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रवाशांनी आपल्यालाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत रेल्वे ट्रॅकवर उतरले.


हे ही वाचा – सरकारने घेतला निर्णय, आता ३१ डिसेंबरपर्यंत करा Work From Home!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -