घरमुंबईनवी मुंबईतील ४७०० पोलिसांची होणार Antigen test! पहिल्याच दिवशी ६५५ पोलिसांची तपासणी

नवी मुंबईतील ४७०० पोलिसांची होणार Antigen test! पहिल्याच दिवशी ६५५ पोलिसांची तपासणी

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिकेकडून पोलीसांच्या आरोग्याची विशेष काळजी

कोव्हीड १९ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ हाती घेतले आहे. या अनुषंगाने अर्ध्या तासात त्वरित तपासणी अहवाल हातात येणाऱ्या रॅपीड Antigen test सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र तैनात असणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रकृतीबद्दलच्या आस्थेने गुरुवारी आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात Antigen test ला प्रारंभ करण्यात आला.

गुरुवारी पहिल्याच दिवशी ६५५ टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी २० व्यक्तींचे पाॅझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले असून त्यांचे त्वरित विलगीकरण करण्यात येऊन उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

- Advertisement -

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ४७०० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्वांची Antigen test करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.


ठाण्यात घरकाम करणाऱ्या महिला, नाका कामगारांची Antigen test होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -