घरताज्या घडामोडीThane Corona Update: ठाण्यात आज कोरोनाचे ३१७ नवे रुग्ण, तर ५ जणांचा...

Thane Corona Update: ठाण्यात आज कोरोनाचे ३१७ नवे रुग्ण, तर ५ जणांचा मृत्यू

Subscribe

ठाण्यात आज ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने शहरामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोना कोविड-१९ रुग्णांची आजची एकूण संख्या ६ हजार २६८ आहे.

मुंबईसह ठाण्यातही कोरोनाचा कहर सुरू असून ठाण्यात आज ३१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने शहरामध्ये प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोना कोविड-१९ रुग्णांची आजची एकूण संख्या ६ हजार २६८ आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे ५६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात १३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ठाण्यात १० हजार २४ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ठाणे महापालिकेच्यावतीने खासगी त्याचबरोबर सरकारी लॅबच्या माध्यमातून कोविड-१९ ची तपासणी करण्यात येते. महापालिकेने स्वत:चीही लॅब सुरु केली असल्याने इतर शहरांच्या तुलनेने ठाणे शहरामधील कोविड-१९ तपासणीचे प्रमाण हे जास्त आहे.

- Advertisement -

मुंबईत आज कोरोनाचे १,२५७ नवे रुग्ण

मुंबईतही कोरोनाचा कहर सुरू असून मुंबईत आज १ हजार २५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ०५ हजार ८२९ वर पोहचली आहे. तर ५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५ हजार ९२७ वर पोहचला आहे. तर आज दिवसभरात मुंबईमध्ये १ हजार ९८४ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत मुंबईत ७७ हजार १०२ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर नवी मुंबईतील रुग्णांची संख्या १२ हजार ५९९ झाली आहे. गुरुवारी नवी मुंबईतील २११ रुग्ण बरे आले असून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८ हजार १३६ एवढी झाली आहे. नवी मुंबईत सद्यस्थितीत ४ हजार ९८ Active रुग्ण आहेत. आतापर्यंत नवी मुंबईत ३६५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus Maharashtra: राज्यात २४ तासांत तब्बल ९८९५ नवे रूग्ण; २९८ मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -