घरमुंबईमुंबईत आणीबाणी वैद्यकीय सुविधेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ३ वाहनांचे लोकार्पण

मुंबईत आणीबाणी वैद्यकीय सुविधेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ३ वाहनांचे लोकार्पण

Subscribe

ही वाहने 'मुरली देवरा फाऊंडेशन' व 'गोदरेज कंपनी' यांच्यामार्फत आणि आमदार अमिन पटेल व माजी खासदार मिंलींद देवरा यांच्या सहकार्याने उपलब्ध

‘चेस द व्हायरस – ट्रेसिंग – ट्रॅकींग – टेस्टींग – ट्रिटिंग’ या चतु:सूत्रीची अंमलबजावणी यशस्वीपणे व अविरतपणे करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय साधने असलेल्या वाहनांच्या ताफ्यात गुरुवारी आणखी तीन वैशिष्ट्यपूर्ण वाहनांचा समावेश झाला आहे. ही वाहने ‘मुरली देवरा फाऊंडेशन’ व ‘गोदरेज कंपनी’ यांच्यामार्फत आणि आमदार अमिन पटेल व माजी खासदार मिंलींद देवरा यांच्या सहकार्याने उपलब्ध झाली आहेत. या तिन्ही वाहनांचे लोकार्पण गुरुवारी करण्यात आले.

लोकार्पण करण्यात आलेल्या तीन वाहनांपैकी दोन वाहने ही प्राणवायू सुविधेसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रसामुग्रीसह सुसज्ज आहेत. तर तिसरे वाहन हे कोविड चाचणीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनांनी व क्ष-किरण यंत्रासह सुसज्ज आहे. ही तिन्‍ही वाहने तीन चाकी असून आकाराने छोटी आहेत. ज्यामुळे अरुंद रस्त्यांवर देखील या वाहनांचा उपयोग करणे तुलनेने सुलभ असणार आहे. ही वाहने ‘मुरली देवरा फाऊंडेशन’ व ‘गोदरेज कंपनी’ यांच्यामार्फत आणि आमदार अमिन पटेल व माजी खासदार मिंलींद देवरा यांच्या सहकार्याने उपलब्ध झाली आहेत. याबद्दल महापालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांनी आमदार आणि माजी खासदार यांच्यासह सहकार्य करणाऱ्या संस्‍थांप्रती आभार व्‍यक्‍त केले आहेत.

- Advertisement -

महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक २ येथे या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार . अमिन पटेल, माजी खासदार मिलिंद देवरा, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी हे विशेषत्वाने उपस्थित होते. तसेच महापालिका आयुक्तांचे उपायुक्त चंद्रशेखर चोरे, परिमंडळ १ चे उपायुक्त . हर्षद काळे, ‘ए’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त चंदा जाधव, ‘बी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन आर्ते, ‘सी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले, ‘इ’ विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर, ‘इ’ विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. शैलेंद्र गुजर यांच्यासह महापालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


तिने कोरोनाला हरवले; पण कुटुंबातील इतरांचा कोरोनाने घेतला बळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -