घरCORONA UPDATEख्रिस्ती कोरोनाग्रस्त मृतांचे दफन करण्यास सरकारची परवानगी!

ख्रिस्ती कोरोनाग्रस्त मृतांचे दफन करण्यास सरकारची परवानगी!

Subscribe

कोरोनामुळे मृत पावलेल्या ख्रिस्ती समाजातील इसमाचे ख्रिस्ती सिमेट्रीमध्ये दफन करण्याची परवानगी मिळत नसल्याने वसईतील ख्रिस्ती समाज नाराज होता. अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या निर्देशानुसार योग्य ती खबरदारी घेऊन कोरोनाने मृत पावलेल्या ख्रिस्ती समाजातील व्यक्तीच्या शरीराचे वसईत ख्रिस्ती सिमेट्रीमध्ये दफन करण्याची परवानगी वसई विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार योग्य ती खबरदारी घेऊन कोरोनाने मृत पावलेल्या व्यक्तीच्या शरीराचे दफन केल्यास नागरिकांना कोणतेही नुकसान संभवत नाही, असे उच्च न्यायालयाने आपल्या निर्देशात म्हटले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने ख्रिस्ती सिमेट्रीमध्ये कोरोनाग्रस्त मृतांची शरीरे पुरण्यास परवानगी दिली होती. पण, वसई विरार महापालिकेने तशी परवानगी न दिल्याने ख्रिस्ती समाजातून नाराजीचा सूर होता. याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मेडा आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे आणि आयुक्त गंगाथरन डी. यांना कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान, मंगळवारी आयुक्त गंगाथरन यांनी नवघर-माणिकपूर कार्यालयात बैठक घेऊन वसईतील ख्रिस्ती सिमेट्रीमध्ये दफन करण्याची परवानगी दिली. त्यामुळे वसईतील ख्रिस्ती समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.


हे ही वाचा – Shocking: अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने केली आत्महत्या!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -