घरताज्या घडामोडीमुंबईतील शाळांची दहावीच्या निकालात बाजी!

मुंबईतील शाळांची दहावीच्या निकालात बाजी!

Subscribe

दहावीच्या निकालात राज्यातील तब्बल ८६३० शाळांचा निकाला १०० टक्के लागला आहे. यामध्ये मुंबईतील शाळांनी बाजी मारली आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या निकालात राज्यातील तब्बल ८६३० शाळांचा निकाला १०० टक्के लागला आहे. यामध्ये मुंबईतील शाळांनी बाजी मारली आहे. मुंबईतील तब्बल १७१४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, शिक्षणाची पंढरी असलेल्या पुण्यातील १६९३  शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

मुंबई चौथ्या स्थानावर

दहावीच्या निकालाच्या क्रमवारीत यंदा मुंबईने पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली असली तरी मुंबईतील विद्यार्थी व शाळांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यात २२ हजार ५७० शाळांमधून १५ लाख ७५  हजार १०३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. राज्यातील १०० टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये मुंबई विभागाने बाजी मारली आहे. मुंबईतील ३७७४ शाळांपैकी १७१४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्याखालोखाल पुण्यातील ३५०७ शाळांपैकी १६९३  शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नाशिक विभागाने तिसरा क्रमांक पटकावला असून, नाशिकमधील २७२४ शाळांमधील ७३२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर सर्वाधिक निकाल लागणार्‍या कोकणातील ६४२  शाळांपैकी ४४३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

- Advertisement -

एका शाळेचा निकाल शून्य टक्के

एकीकडे राज्यातील ८३६०शाळांचा निकाल १०० टक्के लागला असताना अवघ्या २८ शाळांचा निकाल हा शून्य टक्के लागला आहे. यामध्ये लातूरमधील सर्वाधिक ६ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला तर त्याखालोखाल औरंगाबादमधील सहा, पुण्यातील चार, मुंबई व अमरावतीमधील प्रत्येकी तीन शाळा आहेत. त्याचबरोबर नागपूर, कोल्हापूर व नाशिकमधील प्रत्येक एका शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

२० विषयांचा निकाल १०० टक्के

राज्य मंडळाकडून एकूण ६०विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये २० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. १०० टक्के निकाल लागलेल्या विषयांमध्ये सिंधी, कन्नड,तेलूगु, तामिळ, सोशल सायन्स, कृषी, मिडिया अ‍ॅण्ड इंटरटेन्मेंट, टूरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल या विषयांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -