घरमतप्रवाहभाग ७ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना करून लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात...

भाग ७ – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना करून लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश

Subscribe

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी "साहेब माझा विठ्ठल" या सदराखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सामाजिक, राजकीय जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या घटनांवर आधारीत लेख लिहिले आहेत. त्या लेखांची ही मालिका.

आजच्या या आधुनिक जगात शिक्षणाच महत्व आपण जाणून आहोतच.आपल्या आयुष्याचा यशाचा पाय हा या शिक्षणाच्या जोरावरच उभा असतो. १९८५ विरोधी पक्षनेते असताना काही शिक्षण तज्ञांकडून पवार साहेबांना “मुक्त विद्यापीठाच्या” संकल्पनेबद्दल माहिती मिळाली. पवार साहेबांनी याच महत्व जाणलं आणि लगोलग तत्कालीन सरकारला त्याची अंमलबजावणी करायला सुचवलं. पण त्या सरकारने ते प्रकरण काही सिरियसली घेतलं नाही. योगायोगाने 1988 साली साहेब राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. आणि या मुक्त विद्यापीठाच्या संकल्पना प्रत्यक्ष साकारायची संधी त्यांना मिळाली. आणि या संधीच साहेबांनी अक्षरशः सोनं केलं.

परिस्थितीमुळे पुरेस शिक्षण घेऊ न शकलेली,अर्धवट शिक्षण राहिलेली,किंवा इतर काही अडचणीमुळे अनेकांना आपलं शिक्षण पूर्ण करता येत नाही.कधीकधी वेळ, ठिकाण आणि शिक्षकांचा प्रॉब्लेम असतो.अश्यावेळी या सर्वांवर उपाय हवा होता. साहेबांनी यावर मुक्त विद्यापीठ नावाचं उत्तर शोधलं. महाराष्ट्रातील विविध भागात असणाऱ्या तरुणांना आणि विशेष करून महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुक्त विद्यापीठाचा आराखडा तयार करण्यात आला.

- Advertisement -

इंग्लडंमध्ये जगातील पहिलं मुक्त विद्यापीठ १९६९ साली उभा करण्यात आलं होत.या व्यवस्थेची एकूणच कार्यपद्धती समजून घेण्यासाठी साहेबांनी इंग्लडचा दौरा केला. तिथली संकल्पना समजावून घेतली. आणि आपल्या कडील परिस्थितीनुसार त्यात बदल केले. सोबतच या विद्यापीठाची कार्यप्रणाली आणि कार्यक्षेत्र देखील नक्की केले.

१९८८ साली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच म्हणजे १९८९ साली राज्यात एक नवं मुक्त विद्यापीठ साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे निर्माण झालं होत. ज्याचा फायदा या राज्यातल्या लाखो युवकांना झाला आहे. या विद्यापीठाची डिग्री आज इतर विद्यापीठांच्या समकक्ष मानली जाते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची देखील या विद्यापीठाला मान्यता आहे.

- Advertisement -

आणि,लाखो युवकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पाडत, त्यांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या या विद्यापीठाच नाव साहेबांनी अस ठेवलं आहे, “यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ”.

Jitendra Awhad
Jitendra Awhadhttps://www.mymahanagar.com/author/jitendra-awhad/
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -