पक्ष व चिन्हाच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही – राहुल शेवाळे

शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसल्याचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

rahul shewale

शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाबाबतच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसल्याचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल शेवाळे यांनी माहिती दिली. (Supreme Court has not stayed the Election Commission decision on party and symbol says Rahul Shewale)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देऊन त्यांना धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले. याबाबत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी ठाकरे गटाचे वकिल कपील सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयला स्थगिती देण्याबाबत युक्तीवाद केला.

याशिवाय, शिवसेनेकडून व्हीप लागू करून आमदार अपात्र ठरवू शकतात, असाही युक्तीवाद त्यांनी केला. शिवाय, या शिवसेनेकडून शिवसेनेच्या जागा आणि बँक खात्यांवर हक्क दाखवला जाऊ शकतो, अशी शक्यताही यावेळी कपिल सिब्बलांनी वर्तवली. परंतु, ‘हा निवडणूक आयोगाचा निर्णय असल्याने त्यावेळी सर्वोच्च न्यायलयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे’, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्याची नोटीस दिली आहे. या नोटीसनुसार, शिवसेना आणि ठाकरे गटाला निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उत्तर द्यायचे आहे. त्यामुळे आता पुढील दोन आठवड्यानंतर याबाबत सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या जैसे थे परिस्थितीमध्ये शिंदे गटाला ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावता येणार नाहीये. ठाकरे गाटाच्या आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आता शिंदेंच्या शिवसेनेला असणार नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे. त्यामुळे दोन आठवडे परिस्थिती जैसे थे असणार आहे.


हेही वाचा – शपथ देताना शिंदेंना विचारलं होतं का, तुम्ही कोणत्या पक्षाचे? सिब्बलांचा राज्यपालांवर ठपका