घरटेक-वेकचीनचा 'सुपर कॉम्प्युटर' जगभरात वेगवान !

चीनचा ‘सुपर कॉम्प्युटर’ जगभरात वेगवान !

Subscribe

चीनने तयार केलेला ‘सनवे एक्सासेल’ नावाचा कॉप्युटर सध्या जगभरात गाजतो आहे. जगातील अन्य सगळ्याच कॉम्प्युटर्सना मागे टाकत ‘सनवे एक्सासेल’ हा जगातला सर्वात वेगवान कॉम्प्युटर ठरल आहे. चीनची निर्मिती असलेल्या या सुपरकॉम्प्युटरमध्ये संगणक क्षेत्रातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. सध्या या सुपरकॉम्प्युटरचे प्राथमिक रुप तयार करण्यात आले असून, येत्या काळात त्यामध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत. ‘सनवे एक्सासेल’मधील वेगवान तंत्रज्ञान वापरुन सेकंदाला ‘क्विटिलियन’ गणने (१ अब्ज- एकावर १८ शून्य) करणं सहज शक्य होणार आहे. त्यामुळे ‘सनवे एक्सासेल’च्या सहाय्याने खूप मोठी आकडेवारीही चुटकीसरशी करता येईल, असा दावा निर्मात्यांनी केला आहे. दरम्यान २०२० पर्यंत ‘सनवे एक्सासेल’ कॉम्प्युटरचं जगातील सर्वात प्रगत आणि वेगवान व्हर्जन पूर्ण होईल अशी माहिती, नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग सेंटरचे संचालक यांग मेइहाँग यांनी दिली आहे.

हेही वाचा: जगातला सर्वात लहान कॉम्प्युटर! तांदळाएवढा आकार

चीनपाठोपाठ अमेरिका आणि जपान हे देशही असाच महासंगणक तयार करण्याच्या स्पर्धेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार २०२१ पर्यंत अमेरिका जगातील सर्वात शक्तीशाली आणि वेगवान संगणक लाँच करणार आहे. भारताकडेही अशाचप्रकारचा एक महासंगणक असून ‘प्रत्युष’ असं त्याचं नाव आहे. भारताने बनवलेला प्रत्युष महासंगणक पुण्याच्या IITM हवामानशाळेत बसवण्यात आला आहे. हवामानाचा अंदाज देणाऱ्या या महासंगणकाचा वेग सेकंदाला ६.८ पेंटाफ्लॉप अर्थात १ हजार दशलक्ष गणने इतका आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -