घरCORONA UPDATECorona Update : मुंबईत आज ९७० नवे कोरोनाबाधित रूग्ण, ४६ मृत्यू!

Corona Update : मुंबईत आज ९७० नवे कोरोनाबाधित रूग्ण, ४६ मृत्यू!

Subscribe

कोरोनाचा वेगाने प्रसार होणाऱ्या मुंबईत आज ९७० नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले. त्यामुळे आता मुंबईच्या कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १७ हजार ४२१ वर पोहचली आहे. तर ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ६४९० वर पोहचला आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये सोमवारी ९७० नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २९ पुरुष तर १७ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील २ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३० जण हे ६० वर्षांवरील, तर १४ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.

- Advertisement -

मुंबईत कोरोनाचे ७५४ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ८३ हजार १९९ वर पोहचली आहे. तसेच १७९० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ९० हजार ८९ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.


हे ही वाचा – नवं संकट: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, NDRFच्या तुकड्याही सज्ज!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -