घरमुंबईमुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र संशोधन केंद्र स्थापन होणार

मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र संशोधन केंद्र स्थापन होणार

Subscribe

वित्तीय बाबींशी निगडित विविध विषयांवर संशोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागात लवकरच अर्थशास्त्रातील संशोधन केंद्र स्थापन होणार आहे.

वित्तीय बाबींशी निगडित विविध विषयांवर संशोधन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागात लवकरच अर्थशास्त्रातील संशोधन केंद्र स्थापन होणार आहे. यासाठी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी व युटीआयचे माजी अध्यक्ष डॉ. एस. ए. दवे यांनी ५ कोटीची देणगी दिली. नुकताच या विभागाने १ ऑगस्टला आभासी पद्धतीने आपला १०० वा वर्धापन दिन साजरा केला.

१०० वा वर्धापन दिन साजरा करणार्‍या अर्थशास्त्र विभागाने २०१७ मध्ये कात टाकत मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी या नावाने नावारूपाला आले. महाराष्ट्र शासनाने रुपये २५ कोटीचे अनुदान या विभागास मंजूर केले. विविध विषयांवर संशोधन आणि सार्वजनिक धोरण तयार करण्यासाठी विभागामार्फत कार्ये सुरु असून युनिसेफच्या माध्यमातून अनेक उपक्रमांना सुरुवात करण्यात आली. मात्र आता या विभागामध्ये वित्तीय बाबींशी निगडीत विविध विषयांवरील संशोधनावर अधिक भर देण्यासाठी संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठातील स्वायत्त, नावाजलेले आणि सुप्रतिष्ठित विभाग म्हणून या विभागाची ख्याती आहे. विभागातील माजी विद्यार्थ्यांनी देश-विदेशात त्यांच्या कर्तृत्वाने लौकिक प्राप्त केले आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रा. वकील, प्रा. दांतवाला, प्रा. लकडावाला आणि प्रा. ब्रम्हानंद यांचा नामोल्लेख होतो. यांच्या सन्मानार्थ मेमोरिअल लेक्चर्सचे आयोजन केले जात असल्याची माहिती विभागाच्या संचालिका प्रा. माला लालवानी यांनी दिली.

- Advertisement -

नुकत्याच या विभागाने १ ऑगस्टला १०० वा वर्धापन दिन साजरा केला. वर्धापन दिनी संशोधन केंद्राच्या स्थापनेबाबत घोषणा करण्यात आली. वर्धापन दिनाचे औचित्य साधून विभागामार्फत विभागातील माजी विद्यार्थी तथा राज्यसभा खासदार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. नरेंद्र जाधव यांचे इंडस्ट्रीअल रिवॉल्युशन ४: ग्लोबल पब्लीक पॉलिसी इस्यूज इन इकोनॉमी अँड नेशनल सिक्यूरिटी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्रमुख उपस्थिती प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक प्रा. अभय पेठे, संचालिका डॉ. माला लालवानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -