घरताज्या घडामोडीदिशाचा मृतदेह नग्नावस्थेत? मुंबई पोलिसांनी केला खुलासा!

दिशाचा मृतदेह नग्नावस्थेत? मुंबई पोलिसांनी केला खुलासा!

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूवरूनही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपाचे नेते नारायण राणे यांनी दिशा सालियानची बलात्कार करून हत्या केल्याचा दावा केला होता. त्यानंतर माध्यमांवर आलेल्या दिशाचा मृतदेह नग्नावस्थेत सापडल्याचं वृत्ताने पुन्हा एकदा उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे. या वृत्तावर मुंबई पोलिसांनी याविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे.

दिशा सालियानचा मृतदेह नग्नावस्थेत आढळल्याची बातमी चुकीची आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी दिशाचे पालकही घटनास्थळी होते. दिशानं तिची मैत्रीण अंकिताला शेवटचा फोन केला होता, तिचाही जवाब नोंदवण्यात आला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत २०-२५ लोकांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. माध्यमांनी शवविच्छेदन अहवालानुसार वृत्त दिलं होतं की, दिशा सालियानचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -