घरताज्या घडामोडीबँड पथकांवर उपासमारीची वेळ; गणेश मिरवणुकीना परवानगी देण्याची मागणी

बँड पथकांवर उपासमारीची वेळ; गणेश मिरवणुकीना परवानगी देण्याची मागणी

Subscribe

उल्हासनगर महापालिका प्रशासनाने गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवर बंदी आणल्याने बँड आणि नाशिक ढोल वाजवून उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकानदारांप्रमाणे आमच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मिरवणुकांना परवानगी द्या, अशी मागणी बँड पथक असोसिएशनने केली आहे.

कुटुंबावर उपासमारीची वेळ

उल्हासनगर शहरातील सिंधी व्यापारी हे गणपती बाप्पाचे भक्त आहेत. त्यामुळे उल्हासनगर शहरात गणेशोत्सवाची धामधूम असते. यामुळे उल्हासनगर शहरात बँड पथके आणि नाशिक ढोल पथकांची चलती असते. यामुळे उल्हासनगर शहरात जवळपास ६० बँड पथके असून या पाठकांमध्ये १ हजारपेक्षा अधिक कलाकार काम करतात. या बँड पथकाना गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आणि लग्नसराईच्या मुहूर्तांवर मोठी मागणी असते. मात्र, कोरोनामुळे बँड पथकवाल्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत बँड पथकचे सदस्य वासुदेव वानखेडे यांनी सांगितले की, ‘कोरोनामुळे मे महिन्यातली लग्नसराई आणि दहीहंडी उत्सव यंदा शांततेत पार पडला. आमची आशा गणेशोत्सवावर होती. मात्र, यंदा गणेशोत्सवातील मिरवणुकीवर बंदी आल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने आम्हा कलाकारांकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे’.

- Advertisement -

‘दरवर्षी पुढच्या गणेशोत्सवाची बिदागी देऊन अॅडव्हान्स बुकिंग करतात. मात्र, यंदा मिरवणुका नसल्यामुळे मंडळाचे सदस्य पैसे परत मागत आहेत. इथे आमच्या घरी किराणा खरेदी करायला पैसे नाहीत. आम्ही त्यांना काय उत्तर द्यायचे. प्रशासनाने याचा विचार करून मिरवणुकांना परवानगी दिली पाहिजे’. – गणेश तुपे; बँड पथकाचे सदस्य

‘आमच्या घराच्या गाडा हा व्याजाने घेतलेल्या पैश्यावर चालत आहे. आज सहा महिने झाले हाताला काम नाही. व्याज ही देता येत नाही. हे असेच राहिले तर आम्हाला आणि आमच्या कुटुंबाना आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे शासनाने मिरवणुकांना परवानगी द्या नाही तर अनुदान द्या’. – मनोज तायडे; बँड पथकाचे सदस्य

- Advertisement -

कोविड १९ चे संक्रमण थांबविण्यासाठी गणेशोत्सव काळासाठी शासनाकडून दिशानिर्देश आले आहेत. त्या अंतर्गत मिरवणुकांवर बंदी घातली आहे. यामुळे यंदा बँड पथकातील सदस्यांनी सहकार्य करावे. – युवराज भदाणे; जनसंपर्क अधिकारी


हेही वाचा – Pune Corona: आज १,५५६ नव्या कोरोनारुग्णांची वाढ; १,५७० जणांना डिस्चार्ज


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -