घरमुंबईपायाभूत चाचण्यावरुन नवा गोंधळ

पायाभूत चाचण्यावरुन नवा गोंधळ

Subscribe

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी पायाभूत चाचण्यावरुन सध्या नवा वाद सुरु झाला आहे. ही परीक्षा येत्या वर्षांपासून घेण्यात येणार नसल्याचे सकंते शिक्षण विभागाने दिले होते.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यातील दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी पायाभूत चाचण्यावरुन सध्या नवा वाद सुरु झाला आहे. ही परीक्षा येत्या वर्षांपासून घेण्यात येणार नसल्याचे सकंते शिक्षण विभागाने दिले होते. मात्र त्यानंतरही यंदा या परीक्षेच्या वेळापत्रकासाठीचे पत्रक सध्या महानगरपालिकेने जाहीर केले असल्याने शिक्षक पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील शिक्षणाचा आलेख वाढावा यासाठी राज्य सरकारने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमा अंतर्गत संकलित आणि पायाभूत चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या परीक्षेसाठी गेल्यावर्षी तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या वतीने दुसरी ते नवव्या वर्गातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेतली जात होती. सुरुवातीपासूनच ही परीक्षा वादाच्या भोवर्‍यात अडकली होती. कधी आर्थिक खर्चामुळे तरी कधी या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका झेरॉक्सवाल्यांकडे आढळल्याने ही परीक्षा रद्द करण्याची मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून तशा स्वरुपाचे संकेत देखील देण्यात आले होते. मात्र सध्या सर्व शाळांमध्ये पायाभूत परीक्षांचे वेळापत्रक धाडल्याने नवा गोंधळ निर्माण झाला आहे.

- Advertisement -

या नव्या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्टनुसार परीक्षा होणार असून ३१ ऑगस्टपर्यंत ही परीक्षा सुरु राहणार आहे. केंद्र स्तरावर पाच दिवस अगोदर या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाठविण्यात येणार असून शाळांमध्ये २ दिवस अगोदर ही प्रश्नपत्रिका पाठविण्यात येणार असल्याचे या पत्रकानुसार जाहीर करण्यात आले आहे. एकीकडे शिक्षणमंत्र्यांनी ही परीक्षा होणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर ही परीक्षा जाहीर केल्याने पालकांमध्ये ही संभ्रम निर्माण झाला आहे. या परीक्षेचा उद्देश गेल्यावर्षीच सिद्ध झाल्यानंतरही ही परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेचा विद्यार्थ्यांवर प्रचंड दडपण येत असून त्यानंतरही जर परीक्षा होणार असेल तर त्याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना सहन करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.

यंदा परीक्षा होणार असून लवकरच या परीक्षेच्या संदर्भातील पत्रक जाहीर करण्यात येणार आहे.
– सुनील मगर, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -