घरताज्या घडामोडीकिम जोंग उन जिवंत! कोरियाकडून पुन्हा फोटो प्रसिद्ध

किम जोंग उन जिवंत! कोरियाकडून पुन्हा फोटो प्रसिद्ध

Subscribe

काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या गायब होण्याची बातमी प्रसार माध्यमांवर येत होती. त्यांचे निधन झाले असून त्यामुळे ते जगासमोर येत नसल्याचेही म्हटले जात होते. दरम्यान, पुन्हा एकदा एका एक्सपर्टने असा दावा केला होता की, ‘उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन कोमात गेले असून त्यांची सत्ता आता त्यांची बहिण किम यो जोंग सांभाळणार आहे’, असे देखील समोर आले होते. मात्र, पुन्हा एकदा उत्तर कोरियाने आज किम जोंग यांचा फोटो प्रसिद्ध केला आहे. त्यात त्यांनी किमला काहीही झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी किम जोंग यांचा मृत्यू झाला असून आता त्यांची सत्ता त्यांची बहिण किम यो जोंग सांभाळणार आहे, अशा बातम्या समोर येत होत्या. त्यावर आता उत्तर कोरियाने किंम यांचा अधिकाऱ्यांसोबत असलेला बैठकीचा फोटो जारी करत ते पूर्णपणे स्वस्थ दिसत आहेत. कोरोना व्हायरस आणि गुरुवारी होणार असलेल्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ते बैठक घेत आहेत. कोरियाची अधिकृत सेंट्रल न्यूज एजन्सीने हे फोटो प्रसिद्ध केले असले तरीही किमचे हे फोटो जुने आहेत की नाही याबाबत अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

कोरोना महामारी आणि कोरियाची अर्थव्यवस्था या काळात उद्धवस्त झाली आहे. उत्तर कोरियाने काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्या देशात कोरोना रुग्ण आहेत की नाहीत याबाबत चकार शब्द काढलेला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी किम यांनी जे वक्तव्य केले त्यावरुन देशात कोरोनाने प्रवेश केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मृत बिबट्याची नखे काढून जमिनीत पुरले; तिघांना अटक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -