घरक्रीडा'बीफ पास्ता' मेन्यूवरून सोशल मीडियावर संताप

‘बीफ पास्ता’ मेन्यूवरून सोशल मीडियावर संताप

Subscribe

बीफ पास्ता मेन्यू टीम इंडियाच्या मेन्यूमध्ये बघितल्यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक चाहत्यांनी टीम इंडियाला खडे बोल सुनावले.

टीम इंडियाचा लागोपाठ इंग्लंडकडून दुसरा पराभव झाल्यानंतर आता सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. पण सर्वात जास्त संताप व्यक्त करण्यात येत आहे तो टीम इंडियाच्या मेन्यूमध्ये वाचलेल्या एका पदार्थावरून. बीसीसीआयनं दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर टीम इंडियाचा जेवणाच्या मेन्यूची यादी पोस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये ‘ब्रेस्टेड बीफ पास्ता’ असा एक पदार्थ लिहिण्यात आला होता. यावरून आता अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. बीसीसीआय आणि टीम इंडिया या दोघांवरही सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून खेळाडूंवरदेखील टीकेची झोड उठवली आहे.

- Advertisement -

काय आहे चाहत्यांचं म्हणणं?

बीसीसीआयनं रविवारी खेळाडूंच्या जेवणाचा मेन्यू पोस्ट केला. यामध्ये सूप, चिकन लझानिया, स्टफ्ड लँब, पनीर टिक्का करी, भाताबरोबर स्मॅश्ड पोटॅटो, प्रॉन्स विथ मेरी रोज सॉस, गार्डन सलाड, उकडलेलं अंड आणि ‘ब्रेस्टेड ब्रीफ पास्ता’ असा सगळा मेन्यूचा समावेश होता. तर स्वीट डिशमध्ये चेरी चीज सॉस, अॅपल पाय कस्टर्ड, फ्रेंच फ्रूट सलाड, डार्क चॉकलेट आणि आयस्क्रिम असा मेन्यू ठेवण्यात आला होता. यामध्ये बीफ पास्ता वाचल्यानंतर अनेक लोकांनी तिखट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. ‘बीफ खाल तर असेच खेळाल. तुमच्यासारखे तरूण देशातील तरूणाईला चुकीचा मार्ग दाखवत आहेत,’ असं म्हणत जोरदार टीका केली. तर काहींनी ‘बीफ? परवानगी तरी कशी दिली?’ असाही प्रश्न विचारला. ‘भारतीय क्रिकेट टीममध्ये बीफ हा मेन्यू असणं योग्य नाही,’ असंही काही लोकांनी म्हटलं. दरम्यान काही लोकांनी टीमची बाजूही घेतली. मात्र सोशल मीडियावर जास्त प्रमाणात संताप व्यक्त होतानाच दिसत आहे. यावर अजूनही बीसीसीआय अथवा भारतीय क्रिकेट टीममधील कोणत्याही खेळाडूनं कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -