घरमुंबईठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर कोरोना पॉझिटिव्ह

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाण्यात आतापर्यंत १३० अधिकार्‍यांसह एक हजार ३१२ पोलीस कोरोनाबाधित झालेले असून त्यापैकी अकराशे पोलीस बरे होऊन घरी परतले आहे.

ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दोन दिवसांपासून खोकला आणि ताप येत असल्यामुळे त्यांनी रविवारी कोरोनाची तपासणी केली. या तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ते मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असून प्रकृतीही स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस आणि नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, यासाठी फणसळकर हे कार्यालयात तसेच ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर या सर्वच परिमंडळातील पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेत होते.

- Advertisement -

परप्रांतीयांच्या घरवापसीसाठीही त्यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष दिले होते. मुंब्रा तसेच भिवंडीसारखा संवेदनशील परिसरही त्यांनी पिंजून काढला होता. पोलिसांमध्ये वाढते कोरोनाचे प्रमाण लक्षात घेता त्यांनी सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये काही सामाजिक संस्थांच्या मदतीने कोरोना तपासणी आणि उपचाराची मोहीम राबविली होती. ७० दिवस रुग्णालयात राहून कोरोनाशी लढा देत घरी सुखरूप परतलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांच्या घरी ठाणे पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी नुकतीच भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

ठाणे पोलीस दलात आतापर्यंत ११२ अधिकार्‍यांसह १०६३ कर्मचारी असे एकूण १०७५ पोलिसांनी कोरोनावर मात करून सुखरुप घरी परतले असून त्यापैकी ७०० जण कामाच्या ठिकाणी रुजू देखील झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -