घरCORONA UPDATECorona In Mumbai: दिवसभरात २,१७२ रुग्णांचे निदान; ४४ जणांचा मृत्यू

Corona In Mumbai: दिवसभरात २,१७२ रुग्णांचे निदान; ४४ जणांचा मृत्यू

Subscribe

आतापर्यंत एकूण १ लाख २९ हजार २४४ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईत गेल्या २४ तासांत २ हजार १७२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४४ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६५ हजार २८७ वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत ८ हजार ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार १३२ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १ लाख २९ हजार २४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

मृत झालेल्या रुग्णांपैकी २६ रूग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यापैकी ३० रुग्ण पुरुष आणि १४ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ३ जणांचे वय ४० वर्षा खाली होते. तर ३४ जणांचे वय ६० वर्षावर होते. तर उर्वरित ७ रूग्ण ४० ते ६० वर्षादरम्यान होते. दरम्यान, मुंबईतील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच आतापर्यंत एकूण २७ हजार ६२६ रुग्ण उपचार घेत असून दुप्पटीचा दर हा ५८ दिवस असून ४ सप्टेंबर १० सप्टेंबर दरम्यान कोविड वाढीचा दर १.२० टक्के इतका आहे.

राज्यात २४,८८६ नव्या रुग्णांची नोंद

आज राज्यात दिवसभरात २४ हजाराहून अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३९३ हून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १४ हजारहून अधिक रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,१५,०२३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,७१,५६६ इतके Active रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

देशात २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ

देशात गेल्या २४ तासांत ९६ हजार ५५१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार २०९ रुग्णांच्या मृत्यूंची नोंजद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४५ लाख ६२ हजार ४१५वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ७६ हजार २७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३५ लाख ४२ हजार ६६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ९ लाख ४३ हजार ४८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -