घरताज्या घडामोडीमराठवाडा, खानदेशात ओला दुष्काळ?

मराठवाडा, खानदेशात ओला दुष्काळ?

Subscribe

राज्यात अनेक विभागात अतिवृष्टी झाल्याने शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी या भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत राज्याचे कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. सत्तार यांनी नुकताच मराठवाड्यात पहाणी दौरा केला. या दौर्‍यात त्यांनी अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती कृषी अधिकार्‍यांकडून घेतली. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत त्यांनी ओल्या दुष्काळावर भाष्य केले.

सरत्या मान्सूनने राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. विशेषत: कोकण, मराठवाडा आणि खानदेशात पावसाने कहर केला. या पावसाने उभ्या पिकांची हानी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र पावसाचा जोर फारसा नव्हता. खानदेश, मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पालकमंत्र्यांना बांधावर पोहोचण्याच्या सूचना केल्या होत्या. कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानीचा अंदाज घेत काही विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

- Advertisement -

काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीचा आकडा मोठा आहे. अनेक ठिकाणी 100 मिलीपेक्षा अधिक पाऊस पडला. ज्या भागात 65 मिलीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागात नुकसानीचे पंचनामे करण्याचे सरकारचे धोरण आहे. या धोरणानुसार पंचनाम्यांची माहिती येताच निर्णय घेतला जाईल, असे सत्तार यांनी स्पष्ट केले. या अतिवृष्टीने शेतकरी संकटात सापडला आहे, हे कोणीही अमान्य करणार नाही. संकटात शेतकर्‍यांच्या नजरा सरकारकडे लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -