घरताज्या घडामोडीबॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शनचा तपास करणारे एनसीबीचे वीस अधिकारी क्वारंटाईन

बॉलिवूडच्या ड्रग्स कनेक्शनचा तपास करणारे एनसीबीचे वीस अधिकारी क्वारंटाईन

Subscribe

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनचा पर्दाफाश करून चौकशी सुरू करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) 35 पैकी 20 अधिकारी आणि कर्मचार्‍यांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यातील काहींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. एकाच वेळेस वीस अधिकारी आणि कर्मचारी क्वारंटाईन झाल्याने मुंबई युनिटच्या मदतीला चेन्नई, बंगलोर, अहमदाबाद आणि इंदोर येथील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बोलाविण्यात आले आहे.

सुशांतच्या आत्महत्येचा तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनचा पर्दाफाश करण्यात सीबीआयला यश आले होते, ही माहिती नंतर सीबीआयकडून एनसीबीला देण्यात आली होती. त्यानंतर एनसीबीने ड्रग्स प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली होती, त्यात सुशांत ड्रग्ज आणि बॉलिवूडमधील ड्रग्जच्या गुन्ह्यांचा समावेश होता, या दोन्ही गुन्ह्यांत आतापर्यंत एनसीबीने अठरा आरोपींना अटक केली आहे, त्यात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि इतर आरोपींचा समावेश आहे. यातील काही आरोपींकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जसह विदेशी चलनाचा साठा जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग यांच्यासह इतरांची एनसीबीने चौकशी केली होती. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या चौघींनीही आपण सिगारेट ओढत असल्याचे सांगितले. मात्र, कधीच ड्रग्स घेत नव्हतो असे जबानीत सांगितले आहे. गेल्या एक महिन्यापासून एनसीबीच्या रडारवर 50 हून अधिक बॉलीवूड कलाकारांसह इतरजणही आहेत.

- Advertisement -

या सर्वांची लवकरच चौकशी होणार असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात येणार आहे. काही अभिनेत्यांचे मोबाईल सर्व्हेलन्सवर ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रत्येक हालचालींवर एनसीबीची नजर आहे. या चौकशीदरम्यान एनसीबीच्या काही अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई युनिटमध्ये 35 हून अधिक कर्मचारी वर्ग असून त्यापैकी 20 कर्मचारी सध्या होम क्वारंटाईन आहेत. त्यातील काहीं रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. काहींना घरी तर काहींना रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे कोरोनाबाधित कर्मचार्‍यांच्या संपर्कात राहिल्यामुळे इतरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. एकाच वेळेस 20 अधिक अधिकारी आणि कर्मचारी क्वारंटाईन झाल्यामुळे ड्रग्स कनेक्शनच्या तपासाकामी इतर शहरातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना बोलाविण्यात आले आहे. अलीकडेच बंगलोर, चेन्नई, इंदोर, अहमदाबाद युनिटमधील पंधराहून अधिक अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मुंबईत युनिटमध्ये तपासकामी पाठविण्यात आले आहे. आता या अधिकार्‍यांच्या मदतीने एनसीबीने चौकशी सुरू केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -